Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०

जळत नाहीं. ह्मणूने चरबी व ताडाच्या तेलापासून स्टिअरीक व पामि - टीक आसिडें तयार करण्याच्या रीतीप्रमाणें या तेलांतील घट्ट स्निग्व आसिडें काढून त्याचा मेणबत्या करण्याकडे उपयोग करावा. या सेलांतून निघणाऱ्या घट्ट स्निग्ध आसिडांचें पातळ होण्याचें उष्णमान कमी जास्त आहे. सबब तें उष्णमान मार्गे लिहिलेल्या कृतीनें तपासून नक्की करावें. तें १२५° फा. अंशांपेक्षा जास्त असेल तर त्या एकट्याच द्रव्याच्या मेणबत्त्या कराव्या. त्यापेक्षां कमी असेल तर त्यापेक्षां ज्यास्त उष्ण मानावर पातळ होणाऱ्या घड स्निग्ध आसिडाबरोबर तें मिश्र करून नंतर त्या मिश्र द्रव्याच्या मेणबत्त्या कराव्या. चरबी व ताडाच्या तेलांतील घट्ट स्निग्ध आसिडें काढण्याची रीत पुढें दिली आहे.
 १४ मिस्टील मेण - हें पण तेलच आहे. कारण यांतही ग्लिसराईन असतें. ह्मणून याची मेणबत्ती चांगली जळत नाहीं. जपानी मेणाच्या वरील कृतीप्रमाणेंच यापासूनही मेणबत्तीचें द्रव्य तयार करावें. ती रीत पुढे लिहिली आहे.
 १५ ताडाचे मेण - हें निरनिराळ्या जातीच्या ताडाच्या झाडांच्या सालींपासून, खोडांपासून, फांद्यांपासून व फळापासून काढतात. ते ते भाग खरबरीत कुटून एका लोखंडी कढईत पुष्कळ पाण्याबरोबर टाकून उकळावे. ह्मणजे त्यांतील मेण सुटे होऊन पाण्यावर तरंगतें. थंड झाल्यावर मेण वर जमतें तें काढून घ्यावें. मधमाशांचे मेण स्वच्छ कर ण्याच्या रीतीप्रमाणें हें मेणही स्वच्छ व शुद्ध करावें.