Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८

आसिडें दाबानें काढतां येतात. परंतु तुपांतील घट्ट आसिडांचें पातळ होण्याचें ऊष्णमान मात्र स्टिअरीनच्या पातळ होण्याच्या ऊष्ण- मानापेक्षा कमी आहे. तुपांतील घट्ट पदार्थाच्या मेणबत्त्या जळण्यांत चांगल्या असतात. परंतु तूप, लोणी, हे खाण्याचे पदार्थ असून फार महाग आहेत व त्यांतील घट्ट आसिडाचें पातळ होण्याचें ऊष्णमान थोडें कमी आहे, ह्मणून त्यांचा उपयोग मेणबत्त्यांकडे करीत नाहींत. बटेरिक आसिडाचें पातळ होण्याचे ऊष्णमान फारच कमी आहे. तें पाणी थिजण्यास लागणाऱ्या ऊष्णमानापेक्षां २०° सेंटीग्रेड अंश कमी असतें. शुद्ध लोण्याचें पातळ होण्याचें ऊष्णमान ९५ फा. अंश आहे. तुपाचें यापेक्षां अधिक असतें. तूप व लोणी यांमधून निघ- णाऱ्या आसिडाचें पातळ होण्याचें ऊष्णमान १०७ - ११३° फा. अंश आहे.
 येथपर्यंत मूळ द्रव्यांची माहिती व उत्पत्तीविषयीं वर्णन झाले. परंतु यापेक्षाही जास्त महत्वाची व अधिक उपयोगी माहिती दिली नाहीं. ह्मणून ती येथे सांगतों.
 मेणबत्त्याच्या कामीं अमुक द्रव्य उपयोगी पडेल, हे कशावरून ठरवावें, असा सहज प्रश्न उत्पन्न होतो. ज्या स्निग्ध पदार्थात घट्ट स्निग्ध द्रव्य अधिक असेल, तो पदार्थ त्या कामी वापरावा असें ठोकळ उत्तर आहे. परंतु कोणत्याही स्निग्ध पदार्थात घट्ट व स्निग्ध द्रव्य किती आहे, तें कसें समजावें, असा दुसरा प्रश्न सहजच उद्भवतो. कोणत्याही स्निग्ध पदार्थाचें पातळ होण्याचें ऊष्णमान समजलें, तर त्यांत घट्ट व स्निग्ध द्रव्य किती आहे, तें समजू शकतें. तेव्हां स्निग्ध पदार्थाचें पातळ हो- ण्याचें ऊष्णमान कसे काढावें, तें प्रथम समजले पाहिजे. ती रीति प्रथम देतों.