Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५

अवलंबून असतें. जितकें पामिटीक आसीड त्यांत अधिक असेल, तितकें त्याचें पातळ होण्याचें उष्ण मान कमी असतें. शोध करण्यास्तव रसायनशाळेत तयार केलेलें ह्मणून शुद्ध जें स्टिअरीक आसीड त्याचें पातळ होण्याचें ऊष्णमान वर दिलें, परंतु मोठ्या प्रमाणावर व्यापारी कामांत जे स्टिअरीक आसीड तयार होतें, त्याचें पातळ होण्याचें ऊष्ण मान बरेंच कमी असते. त्याचें कोष्टक पुढे दिले आहे. याशिवाय मेण- बत्त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या व आपल्या देशांत उत्पन्न होणाऱ्या वस्तु आहेत. त्यांची माहिती खाली दिली आहे:-- १ भुइमुगाचें तेल. २ मोहाच्या बियाचें तेल. ३ कोकंबेल. ४ सरक्यांचें तेल. व ५ तूप.
 १९. भुइमुगाचे तेळ:– हें तेल भुइमुगाच्या दाण्यापासून दाबानें काढतात. हिंदुस्थानांत हें पुष्कळ तयार होतें. या तेलांत आरेची- डीक आसीड नांवाचें एक पांढरें व घट्ट स्निग्ध आसीड आहे. या आसिडाचें पातळ होण्याचें ऊष्णमान १६७° फा. अंश आहे. तें रंगांत पांढरें व बांध्यांत कठीण आहे १०० भाग भुईमुगाच्या तेलांतून ४-५॥ भाग आरेचिडीक आसीड निघतें, असें आसन साहेब लिहि तात. स्टिअरीक आसिडापेक्षांही याचें पातळ होण्याचें ऊष्णमान अधिक आहे. या तेलांत जरी थोडें आरेचिडीक आसीड निघतें, तरी ओलीईक आसीड पुष्कळ निघतें; त्याचे पामिटीक आसीड कृतीने तयार करावें. दोन्ही रीती पुढे येतील.
 २०. मोहाच्या बियांचें तेल-मोहाचीं झाडें हिंदुस्थानांत पुष्कळ आहेत. बडोदें सरकारच्या नवसरी, •कडी व बडोदें प्रातांत, मलबार- किनाऱ्यावर तर हीं झाडें अतिशय आहेत. या झाडांची पानें हिंदुलो- कांनीं पवित्र मानिलीं आहेत. या झाडाच्या चिकापासून एक जातीचा रबर तयार होतो; फुलांपासून पिण्याची दारू करतात आणि त्याच्या