घटक अद्याप बरोबर समजले नाहींत. तरी मुख्यत्वेंकरून यांत
प्रामिटीक आसीड बरेंच असतें.
१३. जपानी मेण: - जरी या पदार्थास मेण असें नांव आहे,
तरी तो चरबीच्या जातीचा पदार्थ आहे. कारण त्याचे मुख्य घटक
पामिटीक आसीड व ग्लिसराईन हे पदार्थ आहेत. न्हस सकसीडेनिया
व न्हस व्हरनीसीफेरा नामक झाडांच्या फळांपासून हे मेण काढतात.
या झाडास काकडशिंगीचें झाड हें नांव मराठी भाषेत आहे, असे डा.
मंत्री यांच्या कोशावरून समजलें. काकडशिंगी झाडाच्या फळांपासून
हें मेण काढतां येतें. फळें प्रथम चांगली वाळवितात, नंतर दगडी
जात्यांतून दळून किंवा लाकडी उखळांत कुटून काढतात. नंतर
चाळून व पाखडून त्यांचीं कवचें व वरची साल काढून टाकतात.
खालीं राहिलेला कुटलेला भाग किंतानाच्या पिशव्यांत घालून त्या
पिशव्या उकळत्या पाण्यांत टाकतात. नंतर दाबून मेण काढतात.
४०० शेर बियांचें १०० शेर मेण निघतें. या मेणाचा तुकडा
मोडला असतां आंतील रंग पांढरा किंवा पिवळसर हिरवा असतो.
यास चरबीसारखा गंध येतो; व तो वाईट प्रकारचा असतो.याचें
पातळ होण्याचें ऊष्णमान १२० - १३०° फा. अंश आहे. या मेणात
ग्लिसराईन असल्यामुळे त्याची केलेली मेणबत्ती जळतांना आक्रिओ-
लिनचा वाईट वास येतो. हें वनस्पतिज तेल आहे, परंतु घट्ट अस
ल्यामुळे त्यास मेण ह्मणतात.
१४. मिरटील मेण:-हें घट्ट फिकट हिरव्या रंगाचें असतें. तें मि-
रीकाकार्डी फोलिया व मिरिका सेरीफेरा नामक झाडांच्या फळांपासून त्या
फळांची साल उकळून काढतात. पहिल्या जातीची झाडें लुईसियाना
प्रांतांत व दुसऱ्या प्रकारचीं झाडें केप ऑफू गुड होप येथे होतात. त्यांचें
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/४६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२