Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०

ळत्या आलकोहलचें, आसिडांचे किंवा आलकलींचें रसायनीक कार्य घडत नाहीं. त्याचे मुख्य घटक सेरिलीक व सेरोटीक आसिडें होत.
 चिनांत एकव्या त्याच पदार्थाच्या मेणबत्त्या तयार करतात. परंतु नरम जातीच्या चरबींत मिळविण्याच्या, आणि लवकर विरघळणाऱ्या पदार्थाच्या मेणबत्त्यांस वरून लावण्याच्या कामी याचा उपयोग दुसरे लोक करतात. ह्मणजे ती मेणबत्ती जळतांना तिच्यावर ओघळ येत नाहींत. त्या पदार्थास नेहमीं आलकानेटरूट ( सुरंगी ) व जंगाल या पदार्थोचा तांबडा व हिरवा रंग देतात.
 १०. स्पर्म्यासिटी:-स्परम नामक माशांच्या तेलांत हा पदार्थ सांपडतो. स्वच्छ केलेले स्पर्म्यासिटी द्रव्य पांढरें, पत्रेदार, ठिसूळ गंध- हीन व चवहीन असतें. याचे मुख्य घटक सेटील व पामिटीक आसीड हे आहेत. रासायनिक रीतीनें हें निर्गुण असतें. याचें पातळ होण्याचें ऊष्णमान ११०°-१२०° फा० अंश आहे. हें तयार करण्याची रीत पुढे येईल.

वनस्पतिज मेण.

 ११. कारनोवा मेणः -कार्नुबा पाम नांवांच्या झाडाची फळें, देठ व पानें यांजवर या मेणाचे बारीक थर जमतात. हीं झाडें ब्राझील देशांत फार आहेत. या झाडांस कोपर्निसीआ सेरीफेरा असे ल्याटीन भाषेत नांव आहे. हें ताडाच्या जातीचें झाड आहे. याचा थर असणारी फळें पानें वगैरे सुकवून त्यावरील मेण सोलून काढतात. किंवा मातीच्या भांड्यांत ते पदार्थ शिजवून ते मिश्रण स्थीर ठेवितात. ह्मणजे कांहीं वेळानें तें मेण घट्ट होतें. तें पिवळ्या रंगाचें असून फार कठिण व ठिसूळ असतें. परंतु कृतीनें शुद्ध केलें झणजे पांढरें स्वच्छ होतें. त्याचें