लावणीं, कोडीए ह्यांच्या ऐवज याच्या मेणबत्त्यांचा उपयोग हलक्या
कामाकडे करतात. क्वचित् स्टिअरीक आसिडांत हें मिश्र करून त्याच्या
मिश्र मेणबत्त्या बनवितात. तरी पण या तेलांतील शुद्ध व घट्ट स्निग्ध
आसिडें काढली तर त्याचा उपयोग चांगल्या मेणबत्त्या करण्याकडे
होऊं शकतो. तीं शुद्ध व घट्ट स्निग्ध आसिडें स्टिअरीक आसिडा-
प्रमाणेच काढतात. खोबरेल तेल हिंदुस्थान, सिलोन व अमेरिकेंत
पुष्कळ तयार होतें. तरी कोचीन येथील खोबरेल तेल फार चांगले असतें.
५. ताडाचें तेल:—हें तेल ताडांच्या फळांपासून आफ्रिकेत
पुष्कळ तयार करतात. त्याचा रंग नारिंगासारखा पिंवळा किंवा काळ-
सर पिवळा असतो. यास साध्या साबूसारखा वास येतो. तो वास
व्हायवोलेटसारखा असतो. हें तेल साधारण उष्णमानावर बरेंच
घट्ट असतें. या तेलाचें पातळ होण्याचें उष्णमान ११७.५° फा.
अंश आहे. या तेलांत शेंकडा ७० भाग ओलिईन व ३० भाग पामि-
टीन नामक द्रव्ये असतात. त्या पामिटीनमध्यें पामिटीक आसीड
असतें. पामिटीक आसीड हें स्निग्ध आसीड आहे. त्याचें पातळ
होण्याचें उष्णमान १४३.५° फा० अंश आहे. तें स्वच्छ, पांढरें,
कठिण व नरम चकाकीत द्रव्य आहे. या आसिडाच्या मेणबत्त्या चांगल्या
होतात. परंतु बहुतकरून चरबी व ताडाचें तेल एकत्र करून पुढच्या
भागांत सांगितलेल्या रीतीप्रमाणे त्या मिश्रणापासून घट्ट स्निग्ध आसीड
काढतात व तेंच मेणबत्त्यांच्या कामी फार वापरतात. त्या घट्ट स्निग्ध
आसिडांत स्टिअरीक व पामिटीक अशीं दोन्हीं आसिडें मिश्र असतात.
६. ताडाच्या बियांचें तेल- हे तेल ताडफळांच्या बियांपासून व
कचित् वरच्या सालींपासून काढतात. त्याचा रंग किंचित लालसर पि-
वळा असतो. त्यास खोबरेल तेलासारखा गंध येतो. ताडाच्या तेलापेक्षां
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/४१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७