घेतले. त्यानें या शोधा अंतीं असें ठरविलें कीं, स्निग्ध पदार्थ व पाण
यांचें मिश्रण एका गरम नळींतून आरपार काढून घ्यावें. या नळांचें
उष्णमान ८००° फा० अंश असावें. तींतून मिश्रण काढतांना त्यावर
दर चौरस इंचास २,००० पौंडाचा दाब पडावा. इतक्या गोष्टी
पूर्ण झाल्या ह्मणजे त्या स्निग्ध पदार्थाचें भिन्नीकरण होऊन त्यांतील
ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें निरनिराळी होतात. वरची आसिडें काढून
घेऊन दाबाखालीं पातळ व घट्ट आसिडें निराळीं करितात.
मेसर्स विलसन व पेन यांनीं त्यांत फेरफार करून एक रीत काढून
तिचें पेटंट घेतलें ती रीतः स्निग्ध पदार्थात फार उष्ण वाफ
साधारण दाबाखालीं सोडली ह्मणजे स्निग्ध पदार्थाचें पृथक्करण होतें.
नंतर नळिकायंत्रानें ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें अर्करूपानें काढावीत.
ती स्निग्ध आसिडें दाबानें निराळी करावीत. अशी रीत आहे.
तीस हायप्रेशर रीत ह्मणतात; व ती सन १८१४ पासून सुरू झाली.
युरोपखंडांत आटोक्लेव्ह रीतीनें स्टिअरीक आसिड काढितात;
ती रीतः — एका तांब्याच्या मजबूत भांड्यांत चरबी व ताडाचें तेल
टाकून त्याच्या दर चौरस इंचावर २५० पौंडांचा दाब पडेपर्यंत त्यांत
गरम वाफ सोडतात. त्या भांड्यास एक ढवळ्याचें यंत्र लागू करून
आंतील मिश्रण सतत ढवळत ठेवावें लागतें. त्याच दाबाखालीं व उष्ण-
तेवर तें मिश्रण कित्येक तास ढवळत ठेवलें ह्मणजे भिन्नीकरण पूर्ण
होतें. नंतर वरचीं स्निग्ध आसिडें काढून घेऊन दाबानें निराळीं करि-
तात. या रीतीस आटोक्लेव्ह प्रोसेस ह्मणतात.
पुढे स्परम्यासिटी ह्मणून एक पांढरा व घट्ट पदार्थ माशाच्या तेलांत
सांपडला; त्याच्या मेणबत्त्या बनवूं लागले.
प्याराफीन ह्मणून एक पदार्थ खनिज तेलांत व विशेषेकरून रंगून
येथील खाणीच्या तेलांत सांपडला. त्याचाही उपयोग या कामीं करूं ला-
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/३४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०