Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ३. तिसरी रीत ह्मणजे मि. टिलघमन साहेबांनी केलेल्या शोधांत थोडा फेरफार करून काढलेली तीस हायप्रेशर रीत ह्मणतात.
 या रीतींचें वर्णन:-
 १. सापोनिफिकेशनः - स्निग्ध पदार्थात असणाऱ्या ग्लिसराईन नामक पदार्थाची रसायनप्रीति, आसीड मुळापेक्षां, आलकली मुळाबरोबर अधिक आहे. ह्मणून स्निग्ध पदार्थ सोडा अथवा चुन्याबरोबर उष्ण केला तर त्यांतील ग्लिसराईन सुढे पडतें व साब्रू तयार होतो. जर सोडा वापरला तर तो साबू पाण्यांत द्रवीभूत होतो व चुना वापरला तर तो साबू पाण्यांत अविद्राव्य होतो. याच तत्त्वावर सापोनिफिकेशन रीतीची कल्पना निघाली आहे. स्टिअराईन व पुढे स्टिअरीक आसीड काढण्यांत ह्याच रीतीचा उपयोग चिव्हरल साहेबांनी केला होता, ह्मणून तीस त्यांनीं सापोनिफिकेशन रीत असें झटले आहे. नंतर त्या साबूंतील ग्लिसराईन निराळें करून राहिलेला साबू, तीव्र सल्फ्यूरिक आसिडाच्या- योगानें विद्रवित करितात. ह्मणजे त्या मिश्रणावर पातळ व घट्ट स्निग्ध आसिडें तरंगत असतात. तीं वरचीं आसिडें काढून घेऊन दाबानें निरा- ळीं करितात. त्यावेळेस चिव्हरल साहेब फक्त चरबीचाच उपयोग या काम करीत होते.
 सन १८३६ मध्यें मेसर्स हेमपेल व ब्लंडेल यांनीं ताडाच्या तेला- पासून सापोनिफिकेशन रीतीनें मेणबत्त्या करण्याचें पेटंट घेतलें. परंतु त्या मेणबत्त्या रंगांत काळ्या व स्पर्शास तेलासारख्या चिकट होत्या झणून फारशा लोकप्रिय झाल्या नाहींत.
 सन १८२९ मध्यें मि० सोनास याणीं खोबरेल तेलापासून दाबानें घट्ट व पातळ द्रव्ये काढण्याचें पेटंट घेतले. त्यांपैकीं घट्ट द्रव्यांचा मेणबत्त्यांच्या कामीं उपयोग केला. दाबलेल्या चरबापक्षां खोबऱ्याचें स्टिअरीन अधिक चांगले ठरलें. परंतु त्या मेणबत्त्यांस काजळी फार