Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७

लासा होत नाहीं व होणारही नाहीं. अशी खात्री झाल्यानंतर वरील उपक्रमास आरंभ केला आहे. ही गोष्ट रा. व्यास यांस अवगत आहे. माझ्या प्रयत्नांची दिशा त्यांस उपयोगी व मान्य असल्यामुळे त्यांच्या मनांत मजविषय अत्यंत आदर उत्पन्न झाला आहे. या कारणामुळे साबूच्या कारखान्यास जोडूनच प्रयोग शाळा काढण्याचा त्यांचा संकल्प झाला आहे. त्या कामी परमेश्वर त्यांस पूर्ण यश देवो, अशी त्या जग- न्नियंत्याजवळ माझी प्रार्थना आहे. कदाचित् रा. व्यास यांस या कामी अडचण आली तर माझा हेतु ( मला असलेली माहिती थोड्या खर्चात इतरांस देणे ) अल्पांशानें तरी पार पाडण्यास्तव एकट्या दुकट्या शिकणारा- करितां वर लिहिलेली व्यवस्था सुचवून ठेविली आहे. तिचा उपयोग. करून घेणें उद्योगवृद्धीची इच्छा बाळगणाऱ्या देशहितचिंतकाकडे आहे.
अनुसूया लेपर हॉस्पिटल. ज्येष्ठ वद्य ६ शके १८२८. शंकर यज्ञेश्वर गर्गे, हास्पिटल आसिस्टन्ट इनचार्ज अनुसूया लेपर हास्पिटल, पोस्ट- शिनोर.