वे केसरींत उत्तम अभिप्राय दिला आहे. हे गृहस्थ देवास मुक्काम
साबूचा मोठा कारखाना लवकरच काढणार आहेत. त्या कार-
खान्यास जोडून एक लहानशी प्रयोगशाळा काढावी असी माझी
इच्छा त्यांस दर्शविली होती. त्याप्रमाणे श्री. सरकार मल्हारराव
बाबासाहेब महाराज राजेसाहेब देवास ( छोटीपाती ) व रा. ब. दौ-
लतरावजी खानविलकर दिवाण साहेब देवास यांजकडे जाऊन रा.
व्यास यांनी ही हकीगत निवेदन केली. नंतर याबद्दल बराच विचार
होऊन श्री. राजेसाहेब व त्यांचे मंत्री साहेब या उभयतांसही 'देवास '
मुक्कामीं औद्योगिक शिक्षण देण्याची सोय करणें हें काम अवश्य
वाटलें. यावरून लवकरच तेथे कारखाना निघून साबू शिकण्याचा
कासही निघेल असे वाटतें. आतां वरील गोष्ट परस्वाधीन असल्याने
थोडी शंका उत्पन्न होते. यास्तव उत्सुक मंडळीच्या सोईकरितां याब-
द्दल माझे विचार खाली दर्शविले आहेत:--
कारखाना चालविण्या योग्य साबूचें काम शिकण्यास सुमारें ७-८
महिने लागतात. सबब असा वर्ग काढण्यास अगोदर कढया, भांडी,
सांचे, प्रेस, मिलींग मशीन, व मोल्डींग मशिनें तयार केली पाहिजेत.
तसेंच निरनिराळी तेलें, खार, रंग, व सुगंधी वगैरे पदार्थ विकत घेतले
पाहिजेत. या काम सुमारे तीन हजार रुपयांची आवश्यकता आहे.
एवढी रक्कम रोकड असल्या शिवाय असा वर्ग सुरू करता येत नाहीं,
ह्मणून दरएक विद्यार्थ्याने पूर्ण सत्राची फी सुमारें ७५ रुपये दिली
पाहिजे; व असे विद्यार्थी निदान ५० तरी मिळाले पाहिजेत. म्हणजे
सुमारें पावणेच्यार हजार रुपये रोकड हातांत आल्याशिवाय असा वर्ग
मजसारख्या गरीब मनुष्यास सुरू करता येणे शक्य नाही. प्रामाणीक-
पणाबद्दल खात्री करून देण्यास मी तयार आहे. वनस्पतीज तेलापासून
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४