पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४३

नंतर य या भांड्यांत जळका भाग जो शिल्लक रहातो तो काढून दुसन्या एका लोखंडी उर्ध्वपातनाच्या भांड्यांत टाकावा. त्यास अति उष्णता देऊन शिल्लक राहिलेल्या स्निग्ध आसिडांची वाफ करून ती उडवून थंड क रावी, दोन तीन दिवसांनीं तीं बरींच घट्ट झाल्यावर घर लिहिल्या- प्रमाणें थंड्या व गरम दाबानें त्यांतील स्टिअरीक आसीड निराळें का- ढावें. यायोगें स्टिअरीक आसीड जरा पण फुकट जात नाहीं. .

नंतर त्या लोखंडी उर्ध्वपातनाच्या भांड्यांत काळा पदार्थ शिल्लक

रहातो. त्याचाही उपयोग ब्ल्याक जपान या पदार्थाप्रमाणे लोखंडास रंग देण्याच्या कामी करतात. याप्रमाणे १०० भाग चरबीपासून ६०-६५ भाग स्टिअरीक आ- सीड, २३-२८ भाग ओलिईक आसीड ( पातळ ) व २ भाग काळा पदार्थ तयार होतो. स्निग्ध पदार्थावर अम्लक्रिया घडल्याबरोबर त्याचें पृथक्करण होतें ग्लिसराईन जळून जातें व स्निग्ध आसिडें नि- राळी होतात. पण या वेळेस त्या स्निग्ध आसिडांचा रंग काळा असतो. तो त्यांचा काळा रंग घालविण्यास त्यांचें उर्ध्वपातन करावें लागतें, इतर रीतींनी तयार केलेल्या स्निग्ध आसिडांचा रंग जर काळा असेल तर तो सुधारण्यासही त्या स्निग्ध आसिडांचें पुनः उर्ध्वपातन करावें. तात्पर्य उर्ध्वपातन ही क्रिया या प्रकारांत मुख्य नाहीं. फक्त मुख्य क्रिया ह्मणजे सल्फ्युरीक आसिडानें स्निग्ध पदार्थाचें पृथक्करण करणें एव- ढीच आहे.

पाहिजे त्या रीतींनीं स्निग्ध आसिडें तयार केलेली असली तरीही

पण त्यांचा रंग सुधारणें असल्यास त्यांचें उर्ध्वपातन करावें.

प्रकार २ रा.

३ या रीतीचा दुसरा प्रकार - या प्रकारानें नुसतें पामिटीक आसीड तयार करतात, इंग्लंडांतील प्राइस पेटंट क्यांडल कंपनी क