पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३०

या प्रकारानें काम करण्याची माहिती - १०० शेर स्निग्ध पदार्थ घेऊन त्यांत ३३-५० शेर गोर्डे पाणी मिळवावें, नंतर ढवळून ते मिश्रण त्या पंचपात्रा ( डिजेस्टर ) मध्ये भरावें. पंचपात्राच्या वरचा २-३ इंच भाग रिकामा राहील इतकें तें भरावें. नंतर तें भट्टीवर

  • आडवें किंवा उभें ठेवून खालीं विस्तवाची उष्णता देण्यास सुरवात

करावी. आडवें ठेवले असेल तर त्यांतील सुटा पत्रा असणारी बाजू उंच करून खाली ठेवावी ह्मणजे तो सुटा पत्रा दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुनः पूर्व स्थानीं येतो या योगें सर्व मिश्रण ढवळलें जातें. किंवा तें उभें ठेवलें असेल तर जोरानें नुसतें हलवावें ह्मणजे त्यांतील सुटी सळई इकडून तिकडे व तिकडून इकडे ढकलली गेल्याने ते मिश्रण ढवळलें जातें. याप्रमाणे ढवळण्याचे काम सुरू ठेवून त्या मिश्र- णाची उष्णता ६१२ अंशापर्यंत वाढवावी. नंतर त्या पंचपात्रास लागू केलेल्या उष्णतामापक यंत्रांतील पारा ६१२° फा. आला ह्मणजे ढवळण्याचें काम वारंवार करून तीच उष्णता १० मिनिटें कायम ठेवावी. पाण्याबरोबर स्निग्ध पदार्थाचें गाढसानिध्य व ६१२° फा. अंशांची उष्णता १० मिनिटें कायम राहिली कीं त्या स्नि- ग्ध पदार्थाचे मूळ घटक जे ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें जीं यापूर्वी रसायनसंयोगानें एकत्र होतीं तीं यावेळेस सुटीं पडतात. व दरेकाच्या स्वतंत्र अस्तित्वास लागेल इतका पाण्याचा भाग शोषून घेऊन, यांत्रिक संयोगानें मिश्र अशा स्थितीत राहतात, हाच या रीतीचा मोठा विशेष आहे. अंशावर .

दहा मिनिटानंतर खालची उष्णता बंद करून बराच वेळ तें मिश्रण

निवूं द्यावें. नंतर दहा फूट लांबीचा नळ स्कूनीं या पंचपात्रास लागू करावा. यावेळीं नळाचा भाग नागमोडी आकाराचा केला असता थोड्या जागेत राहूं शकतो व त्यामुळे तो ठेवण्यास लागणारा थंड