त्या हौदांत स्थिर ठेवावे. नंतर त्या खालचे पाणी व मळ एका नळीने दुसऱ्या पात्रांत काढून घेतात व तें वरचें प्याराफीन थंड करण्याच्या खोलींतील साच्यांत सोडतात. या हौदास भोके पाडलेली नळी तळाशीं लागू केली असते. कारण या स्थितीतही ते पातळच असावें लागते. पातळ नसल्यास त्या भोके पाडलेल्या नळींतून वाफ सोडून तें पातळ करावें लागतें. असे हौद कामाच्या प्रमाणानें एक किंवा अधिक अस- तात व ते थंड करण्याच्या ह्मणजे वड्या पाडण्याच्या खोलीजवळच ठेवतात. कारण या हौदांतून ते पातळ प्याराफीन त्या खोलींतील सा- च्यांत सोडावयाचें असतें. अशा कामीं जीं भांडीं, होद, कढया, नळ्या वगैरे सामान लागतें तें सर्व लोखंडाचेंच केलेलें असावें.
येणेंप्रमाणें प्याराफीन गरम करून त्यांतील पाणी व मळ तळीं ज- मवून निराळा करून या साठवणीचे हौदांत फक्त प्याराफीन ठेवलें आहे त्याच्या वड्या किंवा तुकडे पाडावयाचे आहेत. ज्या खोलींत हें वड्या पाडण्याचें काम करतात तीस थंड करण्याची खोली म्हणतात.
ह्या खोलीच्या तळच्या जमिनीस उत्तम चुनेगच्ची केलेली असावी. कारण तिजवर पडलेलें प्याराफीन शोषलें जाऊंनये किंवा खराब होऊ नये. ह्या खोलींत प्याराफीन घट्ट करण्याचे सांचे ठेवण्यास लोखंडी बैठकी ठेवाव्या लागतात. दरेक बैठक १७ इंच रुंदीची असते. अशा दोन बैठका मर्यादित अंतरावर ठेवल्या तर त्या खोलीच्या रुंदीची चार फुट जागा त्यांच्या रुंदीने अडविली जाते.या दोन बैठकीच्या रुंदी- मध्ये १४ इंच जागा मोकळी ठेवावी. या दोहोंस दुहेरी बैठक म्हण- तात. त्यांची लांबी खोलीच्या लांबी इतकी असल्यास हरकत नाहीं. याप्रमाणें दरेक डबल बैठकीची रुंदी, त्या खोलीच्या रुंदीच्या ४ फूट जागेंत मावते. त्या जागेपुढें काम करण्यास रस्ता ठेवून दुसरी बैठ- कीची ओळ लागू करावी. याप्रमाणें पाहिजे तितक्या दुहेरी बैठकी
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१०६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२