पान:मेणबत्त्या.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२८ अति दाब देऊन स्निग्ध पदार्थाचे पृथःकरण करण्याचा शोध लाविला. या प्रमाणे काम करण्याचे पेटंट त्याने इंग्लंड व अमेरिका येथे मिळविले. या रीतीने काम करण्यांत लागणा-या आवश्यक साधनांची माहिती पुढे लिहिली आहे:-
 १ पाणी व स्निग्ध पदार्थ यांचे मिश्रण एका अति मजबूत पात्रांत घालून ते पात्र मजबूत बंद करावे. हे पात्र इतके मजबूत असावें की, ६१२° फा. उष्णतेवर सुद्धां आंतील पाण्याची वाफ होऊ नये, इतका दाब आंतील पदार्थावर शिजतांना पडला असतां तें पात्र फुटूं नये.
 २ शिजतांना पाणी व स्निग्ध पदार्थ बरोबर मिश्र राहिले पाहिजेत. पाणी खाली व स्निग्ध पदार्थ वर अशी स्थिति होऊ नये.
 ३ ते मिश्रण कमीत कमी १० मिनिटेंपर्यंत ६१२°फा. अंश उष्णतेवर राहिले पाहिजे.
 ४ ते अति गरम मिश्रण त्या पात्रांतून बाहेर काढण्यापूर्वी थंड करून नंतर बाहेर काढावें.
 ५ नंतर ते स्थिर ठेवून त्यांतील ग्लिसराईन निराळे काढावें. व स्निग्ध आसिडें थंड्या व गरम दाबाने निराळी करावी.
 इतक्या साधनांची पूर्तता या रीतीने काम करण्यांत करावी लागते. या कामी दोन प्रकारची भांडी वापरतात. म्हणून तिचेही दोन प्रकार ठरविले आहेत.ते दुसरा व तिसरा प्रकार हे आहेत.
 दुसऱ्या रीतीचा दुसरा प्रकार--या कामी लागणाऱ्या भांड्यांची माहिती खाली दिली आहे.
 पात्र___पात्र ( डिजेस्टर) हे अर्ध्या पासून पाउण इंच जाड व लोखंडी पत्र्याचे पंचपात्रांसारख्या गोल आकाराचे असते. एक लोखंडी नळ कॉकसहीत, पाहिजे तेव्हां त्यास लागू करता येईल व