पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

  "बळानें काढूं ये मणि मकरदाढेंत दडला"–असे अशक्य कोटींतील एक कार्य कवीने वर्णिलेलें आहे. परंतु शिवालयाच्या महंतांनी मुसलमानांच्या ताब्यांत गेलेली आपली जागा परत मिळवून सुमारे चाळीस हजार रुपये खर्च करून स्मृतिशेष झालेले स्थान पुनः जागृत केलें व त्याला चिरस्थायी बनविलें. ही कामगिरी मकरदाढेंतून मणि काढल्यावर त्याला उचित असें कोंदण बसविण्यासारखीच प्रशंसनीय झाली आहे हे नि:संशय !
 या ठिकाणी स्मारक करण्यासाठी लागणारी जागा देण्यास महंत अनुकूल आहेत. पाहिजे असल्यास ‘भगवा झेंडा' कायमचाच सिंधूतीरावर फडकत राहील असें करावें. कारण किल्ल्यावरील ब्रिटिशनिशाण किंवा मशिदीच्या बाजूचीं हिरवीं फडकीं हींच काय ती तेथे दिसून येतात. भगव्या झेंड्याचा वार्षिक उत्सव केल्याने हा दिवसही चिरस्मरणीय होईल आणि भावी पिढीस या पराक्रमाचे महत्त्व कळेल.
  राघोबा चैत्र शु. प्रतिपदेस अटकेच्या जवळपास होते. त्यांचें एक पत्र चैत्र शु. ८ शके १६७९ चे उपलब्ध आहे, तें अटकेवर झेंडा रोवल्यानंतरचे असल्याने निश्चित मिति कोणती या वादविवादांत न पडतां ध्वजारोपणाचाच दिवस अटकेच्या उत्सवाला ठरवावा हें सर्वथैव उचित होईल.

 अटकेस आल्यावर राघोबादादांस ‘दुराणी किस झाडकी पत्ती' असे का वाटावयास लागलें हें सिंधूच्या तीरावर किंचित्क्षणमात्र उभें राहिल्यावर समजून येतें. किल्ला पिछाडीला, उजवे बाजूस काबूल नदी, पुढे दुर्लघ्य असा सिंधु इत्यादि दृश्यें पाहून आणि आपण पंधराशें मैल दूर येऊन हा किल्ला सर केला ही जाणीव झाली की, अशा आत्मविश्वासाचा वारा आपोआपच वाहूं लागतो. राघोभरारीचा विजय हा

१२