पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बाहेरगावच्या रोग्यांची सोय.

 रोग्यानें आपलें नांव, वय, चालू विकाराची लक्षणें, दुखणें किती दिवसांचें, डॉक्टर किंवा वैद्याने पाहिले असल्यास काय परीक्षा केली, उपाय कोणते केले, चालू रोगापूर्वी कायकाय दुखणीं होऊन गेलीं, चालू दुखणें कुटुंबांत आहे की काय, आहार कोणता मानवतो, सवयी, शौचाचें मान, झोंप, शक्ति वगैरे; रोगी स्त्री असल्यास वरील माहितीशिवाय, एकंदर गर्भधारणा किती झाल्या, हयात मुलें किती, गर्भिणी किंवा बाळंतीण असल्यास किती महिने झाले, वगैरे; रोगी मूल असल्यास दूध आईचें कीं वरचें, दुधाशिवाय दुसरें कांहीं देण्यांत येत असल्यास त्याची माहिती, चालू रोग भावंडांमध्यें होता कीं काय, वगैरे सर्व माहिती सुवाच्य अक्षरानें लिहून कळवावी ह्मणजे औषध व्ही. पी. नें पाठविण्यांत येतें.

 केवळ वैद्यकीय मत ( रोग कोणता, औषध काय घ्यावें, पथ्यापथ्य व इतर सावधगिरीच्या सूचना वगैरे खुलासेवार माहिती ) पाहिजे असेल तर तें दोन रुपये फी घेऊन देण्यांत येतें. (एकंदर पत्रव्यवहार नेहमीं गुप्तच राहील.)

 ज्यांनां मुंबईमध्यें आमच्या देखरेखीखालीं औषधोपचार करून घेणें असेल किंवा आपल्या गांवीं येऊन तपासावें अशी इच्छा असेल, तर त्याप्रमाणें व्यवस्था करण्यांत येते. ( फीसंबंधीं खुलासा पत्रद्वारें मागवावा. )

 वैद्यकीचा धंदा करणाऱ्या व इतर लोकांस त्यांच्या सोयीसाठीं सर्व प्रकारची इंग्रजी व आयुर्वेदिक औषधें व दुसरें वैद्यकीय सामान बाजारभावानें पाठविण्यांत येतें. ( यासाठी औषधांच्या मानानें अजमासें अर्धी रक्कम आगाऊ आली पाहिजे, ह्मणजे बाकी रकमेची व्ही. पी. करण्यांत येईल. ) ·  आमच्या फार दिवसांच्या अनुभवानें उत्तम ठरलेली औषधे मागणीप्रमाणे पाठविण्यांत येतील. अशा औषधांची यादी मागविल्यास मिळेल.

डॉ. ग. पां. काळोखे, चर्नीरोड-मुंबई.