पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

५७

ज्यास्त असते त्या वेळीं ती (लोंकर) बाहेरील उष्णता आंत घेत नाहीं; ही गोष्ट कोणी लक्ष्यांत आणीत नाहीत. खरे पाहूं गेल्यास लोंकर उष्ण व थंड दोन्ही ऋतूंत वापरण्याला सुखावह असते. आतां, लोंकरीमध्ये खर- खरीतपणा असतो, पण तोही सवय झाली ह्मणजे कांहीं भासत नाहीं. उलट, या खरखरीतपणामुळे त्वचेचें कार्य जास्त मोकळेपणीं घडतें व ही गोष्ट आपल्या हिंदुस्तान देशांत फार महत्त्वाची आहे. लोंकर शरी- रांतील वाण व दुसरीं विषकारक द्रव्ये शोषण करीत असल्यानें लवकर घाण होते. ह्मणून वारंवार धुवून वापरली पाहिजे.

 कपडे वापरण्यासंबंधानें कांहीं मुख्य नियम आहेत, ते प्रत्येकानें अवश्य लक्ष्यांत ठेवावे.

 कपडे नेहमीं स्वच्छ असावेत- मग ते आंगांत घालण्याचे असोत किंवा आंथरुणांतील असोत. दिवसा घातलेले कपडे घरीं आल्यावर वापरू नयेत. असे कपडे निजण्याच्या खोलीत न ठेवितां उघड्या जागीं हवेच्या प्रवाहांत ठेवावेत. रात्रीं, धुतलेले स्वच्छ कपडे वापरावेत. अगदीं गरीब माणसानें देखील याप्रमाणे बदलतां येण्यासाठी निदान कपड्यांचे दोन जोड बाळगावे. पोषाख नेहमीं दुहेरी असावा. आंत त्वचेला लागून सदरा, बडी किंवा गंजिफाक लोंकरीचा किंवा निदान लोंकर व सूत मिश्रित कापडाचा असावा; व अगदीं बाहेरचा सुती किंवा तागी कापडाचा असावा. कंबर व पाय उघडे टाकूं नयेत; कारण त्यामुळे थंडी होण्याचा संभव असतो. यासाठी कंबरेसभोंवतीं लोंकरीच्या कपड्याचें किंवा निदान सुती कपड्याचें वेष्टन असावें. असे केल्यानें आंतड्याचा थंडीपासून व सूर्याच्या उष्णतेपासून बचाव होतो. कंबरेखालचे कपडेहि तसेच असावेत. पायांत सैल बूट, वहाणा, जोडे असावेत. त्यांपासून पायांचें रक्षण होतें. गळपट्टे घड नसावेत. डोक्याला रुमाल, पटका,

 मी नि. ५