पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

प्रकारच्या स्वच्छतेचा विचार त्या त्या प्रकरणी केला आहे. चवथा प्रकार जो कपड्यांची स्वच्छता त्याकडे आतां वळूं.

कपडे.

 निरनिराळ्या ऋतूंत हवेंत होणाऱ्या शीतोष्णादि फेरफारांपासून देहाचें रक्षण व्हावें, यासाठी कपड्यांची फार आवश्यकता आहे. शरीराची उष्णता नियमित राखणे, हा आरोग्याचा एक मार्ग आहे व तो कपडे चापरण्यानें आपल्याला साधतां येतो. मात्र ते कपडे कोणत्या प्रकारचे असले पाहिजेत हे जाणले पाहिजे. कपडे निरनिराळ्या प्रकारचे करितात. उदाहरणार्थ; कापूस, ताग, लोंकर, रेशीम, चामडे वगैरे.

 कापसाचे कपडे सफाईदार, तुळतुळीत व टिकाऊ असून किम- तीनें स्वस्त असतात. हे उष्णतावाहक असून पाण्याचें शोषण करीत नाहींत व धुतल्यानें लोंकरीप्रमाणे आकुंचन पावत नाहीत. या व त्यांच्या टिकाऊपणामुळे लोकरीमध्ये त्यांची भेसळ करितात. कापसाचे कपडे घामानें भिजले ह्मणजे त्यांपासून शरीराला सर्दी होण्याचा संभव असतो.

 तागाचे कपडे कापसाच्या कपड्यांप्रमाणेच आहेत पण कापसा- प्रमाणें आंत घालण्याला योग्य नाहींत. हे कापसाप्रमाणे उष्णतावाहक असून पाणी शोषण करीत नाहींत.

 लोंकरीचे कपडे वरील कपड्यांहून थोडे महाग असतात. लोंकर पाण्याचें शोषण करीत असून कापसाप्रमाणे उष्णतावाहक नसल्याने आंगांतील उष्णतेला बाहेर जाऊं देत नाहीं व बाहेरची उष्णता आंत घेत नाहीं; यामुळे आंत वापरण्याला उत्तम मानली आहे. लोंक- रीला लोक गरम समजतात याचें कारण हेंच होय. तिच्या तंतूंत एक प्रकारचें तेल किंवा चरबी असल्याने आणि तिच्या आंतील पोक-