पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

२३


गेले असें कोणीं समजूं नये. उलट ते तास तुमचें आयुष्य दीर्घर करतील यांत संदेह नाहीं. व्यायाम शब्दाचा यौगिक अर्थच 'विशिष्ट दीर्घता' असा आहे. अर्थात् व्यायामानें आयुष्यास दीर्घता आलीच पाहिजे.

 व्यायामापासून शरीरावर होणाऱ्या परिणामांचें वर्णन आर्यवैद्यकांत फार चांगल्या रीतीनें दिले आहे, तें असें :--

 शरीरोपचयः कान्तिः गात्राणां सुविभक्तता ।

 दीप्ताग्नित्वमनालस्यं स्थिरत्वं लाघवं मृजा ॥

 श्रमक्कमपिपासोपणशीतादीनां सहिष्णुता ।

 आरोग्यं चापि परमं व्यायामादुपजायते ॥

 नचास्ति सदृशं तेन किंचित्स्थौल्यापकर्षणम् ।

 न च व्यायामिनं मर्त्यमर्दयंत्यरयो भयात् ॥

 न चैनं सहसाऽक्रम्य जरा समधिरोहति ।

 स्थिरीभवति मांसं च व्यायामाभिरतस्य च ॥

 व्यायामक्षुण्ण गात्रस्य पद्भ्यां उद्वर्तितस्य च ।

 व्याधयो नोपसर्पति सिंहं क्षुद्रमृगा इव ॥

 वयोरूपगुणहीन मपि कुर्यात्सुदर्शनम् ।

( सुश्रुत संहिता . )

 अर्थः – व्यायामानें मनुष्याचें शरीर चांगले पोसतें, त्याची कांति वाढते, अवयव रेखल्यासारखे दिसतात, भूक लागणे, स्थिरपणा, अंग हलकें व स्वच्छ असणें, श्रम, थकवा, तृषा, उष्णता, किंवा थंडी सोस- ण्याची शक्ति असणें, उत्तमोत्तम आरोग्य हे गुण प्राप्त होतात. चर्बी किंवा मेद झडण्यास व्यायामासारखा दुसरा उपायच नाहीं. व्यायाम- शील मनुष्यास भीतीनें त्याचे शत्रु पीडा करूं शकत नाहींत, व जरा ( वृद्धत्त्व ) सहसा आपलें खोगीर ठेवीत नाहीं. व्यायाम करणाऱ्या मनुष्याचें मांस ( अर्थात् स्नायू ) घन होतें. क्षुद्र मृग जसे सिंहाच्या