पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?
उपोद्धात.
सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः ॥

 जगतामध्ये सर्व प्राणिमात्रांची धडपड सुखाकरितां चाललेली आहे.  सुख हें शरीराच्या सुस्थितीवर अर्थात् आरोग्यावर अवलंबून असतें; ह्मणून शरीर निरोगी असणे यासारखी प्राणिमात्रांनां दुसरी मोठी देणगी नाहीं. शरीर निरोगी असले म्हणजे आपले स्वतःचें काम करितां येऊन शिवाय दुसऱ्यांनांहि मदत करितां येते. पण प्रकृति बरोबर नसली, दुखणें आलेले असले, ह्मणजे यापासून शरीर निःसत्त्व व कमजोर होऊन केवळ स्वत:लाच दुःख भोगावे लागते असे नसून घरांतील इतर माणसांनां, आप्तेष्टांनां आणि आपल्या एकंदर परिवारलोकांनां मोठा त्रास सहन करावा लागतो. मनुष्य कितीहि श्रीमंत असो, त्याची शरीरप्रकृति जर दुखण्याने ग्रस्त झालेली असली, तर त्याला त्या श्रीमंतीचें सुख न होतां दुःखच भोगावे लागते. पण ज्याची प्रकृति चांगली आहे, जो धडधाकट आहे, असा एकादा गरीब मजूर कां असेना, त्याला या गरीव स्थितीत जें सौख्य आहे, ते त्या श्रीमंताला कधीहि होणें नाहीं; अणून शरीरप्रकृति निरोगी राखण्यासाठी प्रत्येकानें झटणें किती अगत्याचें आहे, हे कोणालाहि सहज कळण्यासारखे आहे. आरोग्याची खरी योग्यता काय आहे, हें प्रकृति बिघडून शरीराची खराबी झाल्याशिवाय कोणालाहि कळणे शक्य नाहीं.

            मी नि. २