पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
८४]

[माझा जन्मभरचा


त्याच्या हातून मी मोडविली आहे. आणि ती मोडविण्याचा प्रकार असा की, जो आपला शिष्य चंद्रगुप्त नन्दांना मारल्यावर त्यांच्या राज्यावर चाणक्याने बसविला, तो मूळ अरण्यांत सोडून दिलेला व नापत्ता झालेला नंदाचाच मुलगा होता ! नंदववाची शब्दशः प्रतिज्ञा खरी व्हावयाची तर चंद्रगुप्ताचाहि वध चाणक्याला करणें प्राप्त; व तो तर त्याच्या हातून होणें शक्य नाही. कारण त्याला विद्या शिकवून चाणक्यानेच मोठा केला, व त्याच्याच हातून नंदांचा वध व राज्यक्रान्ति करून त्या गादीवर चंद्रगुप्ताला चाणक्यानेच बसविलें. यामुळें आपली प्रतिज्ञा फुकट गेली असें चाणक्याला आपल्या तोंडाने कबूल करावें लागलें. मानी मनुष्याने अशी गोष्ट आपल्या तोंडाने कबूल करणें हीच अीश्वराची अहंकारी मनुष्याला शिक्षा होय या तत्त्वाची मौज या नाटकांत दिसून येते.
 (७१) 'तोतयाचें बंड' शोकपर्यवसायी होण्याशिवाय गत्यंतरच नव्हतें, व तें पर्यवसान चांगले साधलें आहे असें मला वाटतें. त्या नाटकांत मी विनोद पुष्कळ ठेवला आहे. परंतु तोतया पुण्यास धरून आणल्याची हकीकत जेथे खरी सुरू होते तेथून पुढे विनोदाचा एक शब्दहि मी ठेवला नाही. आणि नाना फडणवीस व अमला यांच्या प्रवेशापासून तर दुःखभावनेचें जें आभाळ भरून येण्याला सुरुवात होते तें कडेपर्यंत तसेंच टिकतें, व अखेर तें अगदी गडद होऊन अश्रुपाताचा पर्जन्य पडतो. चंद्रगुप्त नाटकाची कल्पना मुळापासून संकटग्रस्त पण शेवटीं आनंदपर्यवसायी आहे. तोतयाच्या बंडापेक्षा यांत विनोद असा कमी आहे, व करुणास्पद प्रसंग अेकामागून अेक वाढत जातात. तरी त्या सर्वांचा अंत कांही तरी आनंदाच्या प्रसंगांत होणार अशी आंतून मनाला अेक प्रकारची जाणीव असते.
 ( ७२ ) तोतयाच्या बंडावर, त्या वेळीं, वर्तमानपत्रांतून किंवा मासिकांतून परीक्षणात्मक टीका आल्या नाहीत. पुढे पुष्कळ दिवसांनी रा. कोल्हटकर यांनी टीका लिहिण्याला सुरुवात केली. पण लवकरच या नाटकाचा विषय बाजूला राहून त्यांनी नाट्यतत्त्वांच्या चर्चेला जो प्रारंभ केला तिचाच अेक स्वतंत्र ग्रंथ झाला. चंद्रगुप्तावर परीक्षणात्मक अभिप्राय अेकदोन आले. ते दोनहि फार अनुकूल असे होते. पैकी अेक पुण्याचे प्रो.