पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[६५


लेखनकला कोणालाहि हस्तगत करतां येअील. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजांतील आमचे प्रोफेसर शिवराम बापूजी परांजपे यांचें अेक वाक्य मला आठवतें. तें असें की, " बेट्या, Have something to say and it is easily said.” आणि त्याचबरोबर अमेरिकन तत्त्ववेत्ता अिमर्सन यांचें अेक वाक्य मला आठवतें. तें असें की, " A river always makes its own bed. " हीं दोनहि वाक्यें अेकत्र घेतली तर त्यांचा अर्थ असा की, मनांत मतप्रतिपादनाची हौस असली म्हणजे ती शमविण्याकरिता कल्पना सुचूं लागतात, त्या पुष्कळशा मनांत सांठल्या म्हणजे शब्दांच्या द्वारें त्या आपला मार्ग काढतात, व आपल्या प्रवाहाला अनुकूल किंवा पुरेसें पात्र आपल्या सामर्थ्याने निर्माण करतात. नाही म्हणावयाला अुलट बाजूचींहि कांही अुदाहरणें मला माहीत आहेत. म्हणजे मतप्रतिपादन व वादविवाद हें जणू काय त्यांना व्यसनच जडून राहिलेलें असतें. त्या कामीं ते बोलबोलून भांडभांडून आपला जीव घाबरा करतील आणि दुसन्याला कंटाळा आणून त्याचाहि जीव नकोसा करतील. पण लिहिण्याची गोष्ट निघाली की त्यांची गति खुंटली ! अेका पोस्टकार्डाअितकाहि मजकूर त्यांच्या हातून लिहून व्हावयाचा नाही. पण हीं उदाहरणें मी अपवादासारखी मानतों. मला संमत असा नियम म्हटला म्हणजे वरील दोन अिंग्रजी वाक्यांत ग्रथित झालेला.
 (५१) दुर्दैवाने पुष्कळ लोकांच्या समजुतींत ही गोष्ट येत नाही की, वंशवृद्धीशिवाय ज्याप्रमाणें समाज वाढणार नाही, त्याप्रमाणे मतप्रसाराशिवाय समाजाची प्रगति किंवा अुन्नति होणार नाही. कांही लोकांना असें वाटतें की " आमची मतें तीं काय, त्यांना किंमत कसली ?" दुसऱ्या कांहीना असें वाटतें की " आम्हांला काय लिहितां येणार ?" पण पहिल्या प्रकारचें मत चुकीचें व दुसरें मत भ्रमात्मक आहे. लोकोपयोगी अशा विषयावरील प्रत्येक व्यक्तीचें मत निश्चित ठरणें, व तें त्याने प्रकट करणें, याविषयी समाजाचा व्यक्तीवर हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीच्या संग्रहीं असलेला पैसा मिळूनच जशी राष्ट्रीय संपत्ति गणतात, त्याचप्रमाणें समाजांतील व्यक्तींचीं मतें अेकत्र धरूनच राष्ट्राची विचारसंपत्ति गणली
मा. ज. अु. ५