पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
२८]

[माझा जन्मभरचा


अंकाआड कविता घालावयाच्याच असें मी ठरविलें. पण आयत्या वेळीं कविता केसरीच्या संग्रहीं कोठून येणार ? तो झराच आटल्यासारखा झाला होता. म्हणून केसरी अर्ध-साप्ताहिक केल्यापासून, 'अनामिक' या सहीने, स्वतः मीच कविता नव्या रचून त्या घालण्यास सुरवात केली. आणि पहिलीच, सूचक म्हणून, 'गद्य व पद्य' नांवाची व त्या दोन प्रकारांचें वैशिष्ट्य वर्णन करणारी अशी कविता घातली. ती कविता अशी--

गद्य व पद्य

    अेक अर्थ दोन ठायीं  गद्य पद्या भेद नाही
    गद्य शिव पद्य शक्ति  दोन मार्गों अेक भक्ति
    अेका जनक-जननीचीं  गद्य-पद्य बाळें साचीं
    परि करणी अीश्वर करी  भेद स्वभावा अंतरीं
    मंद जड गद्य दादा  पद्य ताअी चंचळ सदा
    गद्य स्तिमित दूर बसे  पद्य गळां पडुनी हसे
    गद्य मानी मनीं कुढे  पद्य निर्भीड ओरडे
    गद्या मनीं दुरुनी आस  पद्य हातें घेअी घास
    गद्य पल्लव विस्तृत  पद्य पुष्प सुगंधित
    गद्य मेघांचें डंबर  पद्य वीज झळके वर
    गद्य पाथरवटी घडण  पद्य रंगीत रोगण
    गद्य आखिव-रेखिव भाषा  पद्य मुक्तहस्त रेषा
    गद्य तर्कग्रस्त भाष्य  पद्य स्फूर्तीचें हविष्य
    गद्य जेवी दगडी शिळा  पद्य जलवीचि-लीला
    गद्य अुद्योगाचा सांठा  पद्य दैवाचा झपाटा
    गद्य विद्वत्तेचें सोंग  पद्य तुकयाचा अभंग

 कांही दिवसांनी हें कवितेचें नवें सदर केसरी हेतुपुरःसर घालीत आहे असें वाचकांच्या लक्षांत आलें, व मग कांहीं कवि कविता पाठवूं लागले.

 (३५) 'लघु' प्रकारच्या लेखांचीं कांही अुदाहरणें - ' शेवटचें लढाअू जहाज', 'दुर्जनसिंग महाराजांची नवसफेड', 'वेताळाचा घाट' "¹.