पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

MAHARASHTRA BHAMINIVILAS. (BY LAXMAN SHASTRI LELE ) Mr. Laxman Shastri Lele of Nasik, the author of the two excellent little books, the one the Marathi Translation of Meghaduta into the same metre as the original,' and the other the. Padyamanjari,' appears before the public with his third production, "the Maharashtra Bhaminivilas,' a translation of the Bhaminivilas of Jagannath into Marathi verse. The author has evidently been at no small pains in preparing this charming rolume. The introduction is delightful. [t clearly and briefly supplies almost every thing that is needed in the way of information as to the Bhaminivilas, its author and other kindred matters. The Marathi renderings, which are printed with the original, fully reproduce in almost every case the spirit of the original, often in the happiest way. The verses are generally simple, sweet & flowing. The style is exceptionally chaste, dignified C elegant. The section that treats of the figures of speech & other critical points that occur in the translation, is admirably handled, will prove of material assistance to the advanced student of Barathi poetry. Altogether the performance deserves high commendation.-A CRITIC. (वरील अभिप्रायाचे मराठी भाषांतर ) महाराष्ट्र भामिनीविलास. लक्ष्मणशास्त्री लेलेकृत 'मेघदूताचें समवृत्त मराठी भाषांतर, ' आणि 'पद्यमंजरी' या दोन उत्कृष्ट छोटेखानी पुस्तकांचे कर्ते रा. रा. लक्ष्मणशास्त्री लेले, नासिककर, यांनी 'महाराष्ट्र भामिनीविलास' या नांवाचें तिसरं पुस्तक प्रसिद्ध केले आहे. हा रमणीय ग्रंथ रचण्याचे कामी ग्रंथकत्यांनी बहत परिश्रम केले आहेत हे सहज लक्षात येण्यासारखें आहे. ग्रंथाला जोडलेली प्रस्तावना रम्य आहे. भामिनीविलास, त्याचा कर्ता आणि तत्संबंधी अवांतर गोष्टी, यांच्यासंबंधार्ने आवश्यक तितकी बहुतेक माहिती तिच्यांत दिलेली आहे. भाषांतर मुळासह छापलें आहे. मूळांतील आशय भाषांतरांत प्रायः पूर्णपणे व फार सफाईनें उतरला आहे. कविता एकंदरीत सरळ, मधुर आणि श्रवणसुंदर आहे. भाषांतरकारांची वाणी अत्यंत शुद्ध, प्रौढ आणि अलंकारिक आह. भाषांतरांतील अलंकार आणि इतर मार्मिक गोष्टी यांचे विवरण दुसऱ्या परािशष्टात केले आहे. यांत ग्रंथकारांनी दाखविलेलें चातुर्य वर्णनीय आहे. मराठी काव्याचा व्यासग करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर परिशिष्टाचा विशेष उपयोग होईल. एकदरात प्रस्तुत ग्रंथ विशेष प्रशंतापात्र आहे. -पक मर्मज्ञ.