पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काव्यपरीक्षणाचा उत्तरभाग (ले. डॉ. श्री. व्यं. केतकर) महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण या पुस्तकाचा उत्तरार्ध याच आकाराच्या सुमारे ३०० पासून ४०० पृष्ठांचा होईल. हा स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यांत येईल. यांत १८९७ पूर्वीच्या वाड्मयपरी- क्षणाचा थोडासा मजकूर येऊन पुढील ७० वर्षीचा मजकूर विशेष सविस्तर येणार आहे. जुन्या मराठी कवितेवर चर्चा करण्यांत ज्या अनेक व्यक्तींनी महत्त्वाची कामगिरी केली आहे अशा व्यक्तींच्या म्हणजे दादोबा पांडुरंग, पितापुत्र चिपळुणकर, परशुरामपंत गोडबोले, न्यायमूर्ति रानडे, वामन दाजी ओक, विनायकराव भावे, रा. पांगारकर, कै. राजवाडे, वगैरेंच्या लेखांतील उतारे सांपडतील, त्याचप्रमाणें साहित्य आणि अलंकार यांवर ग्रंथ लिहिणारे ग्रंथकार म्हणजे पितापुत्र लेलेशास्त्री, माकोडे, व यांसारख्यांच्या लेखांतील भाग त्यांत येईल. त्याप्रमाणेंच आंग्ल साहित्यशाखांतून विचा- रांश घेऊन लेख लिहिणाऱ्या मंडळींपैकी रा. न. चि. केळकर, वासुदेव गोविंद आपटे, माडखोल- कर इत्यादि मंडळींच्या लेखनांतील भाग समाविष्ट होईल. नवीन विचार जुन्या साहित्यशास्त्रास क चिकटविला जात आहे याचेंहि स्पष्टीकरण येईल, सुमारें १०० पुस्तकांवर झालेल्या टीकांचा यांत समावेश केला आहे. टीका निवडतांना ज्या टीकेमध्ये कांहीं विशिष्ट विचार आला आहे त्याच टीका घेतल्या आहेत. (किंमत रु. ३). प्रकाशक श्री. व्यं. केतकर ] कथामंदिर मासिक [ संपादक चिं. ग. कर्वे वरील डेमी अष्टपत्री आकाराचें दरसाल १६०० पासून २४०० पृष्ठे देणारें मासिक काढा वयाचा आम्ही संकल्प केला आहे. या मासिकांत कथा, नाटके व कादंबऱ्या व त्यांच्याविषयीं चर्चा करणारें वाड्मय याखेरीज दूसरें कांहीं द्यावयाचें नाहीं. कथा, नाटके व कादंबऱ्या यांवर चर्चा करणारा जो मजकूर यावयाचा तो देखील होता होईतों प्रसिद्ध होणाऱ्या कादंबऱ्यांच्या प्रस्तावनांसारखा राहील. यांद ज्या कादंबन्या प्रसिद्ध होतील त्या कादंबऱ्या जगांतील निरनिराळ्या राष्ट्रांच्या कादं- बयांचीं ष्ट भाषांतरे असतील. भाषांतरें करतांना पाल्हाळ असलेला भाग कमी करण्यांत येईल, व कथाभागांचें स्पष्टीकरण महाराष्ट्रीय वाचकास होण्यासाठीं कांहीं टीकात्मकहि भाग येईल. पण स्थले आणि व्यक्ती यांचीं नांवें बदलली जाणार नाहींत. ऐतिहासिक कादंबऱ्यांतील कथाभाग समज- ण्यासाठी ज्या कालावर ती कादंबरी असेल त्या काळाचा बोध करणारी प्रस्ताव असेल. नाटका- संबंधानें तीच दृष्टि राहील. येणेप्रमाणे सुमारें जगांतील शंभर उत्तम कादंबऱ्या व नाटकें प्रसिद्ध करावयाच्या आहेत. कादंबयांची निवड थोडीशी झालेली आहे व बरीचशी व्हावयाची आहे. यांत फक्त इंग्लिश कादं- बयांचा समावेश करण्यांत येणार नाहीं. तथापि इतर भाषांत ज्या कादंबन्या प्रसिद्ध होतात त्यांच्या इंग्रजी भाषांतरावरून मराठीत कादंबऱ्या भाषांतर करावयास हरकत नाहीं. तथापि मूळांतून एकदम मराठींत मांडणारा लेखक होता होईल तो पसंत केला जाईल. प्रत्येक लेखकास कांहीं तरी मेहनताना मिळेल. भाषांतरकार बरेचसे मिळाले व सुमारे एक वर्षाची बेगमी होईल इतकें भाषांतर हाती लागले म्हणजे या मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी आमंत्रण करण्यांत येईल. तर लेखकवर्गास जाहीरपणे आमंत्रण करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध होत आहे. संपादक -यशवंत रामकृष्ण दाते, बी. ए. एल्एल्. बी. मुद्रक व प्रकाशक - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, ८४१ सदाशिव, 'ज्ञानकोश' प्रेस पुणे,