पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रीविषयक कार्याला मदत
 महाराजांनी फक्त आपले संस्थान आपल्या सुधारणांचे कार्यक्षेत्र म्हणून स्वीकारले नव्हते; तर गंभीरपणे हाती घेतलेल्या कोणत्याही विचारधारेच्या व्यक्ती अगर संस्थांच्या सुधारणावादी कार्याच्या पाठीशी महाराजांनी आपली आर्थिक आणि नैतिक ताकद उभी केली असल्याचे शेकडो पुरावे बडोदा दफ्तरात उपलब्ध आहेत. सयाजीरावांनी १९०९ साली हिंदू स्त्रियांच्या शिक्षणासाठी न्यायमूर्ती चंदावरकरांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली. १९१४ मध्ये दिल्लीच्या लेडी हार्डिंग्ज स्त्री वैद्य विद्यालयास १ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य केले. १९१६ ला दिल्लीतील लेडी हार्डिग्ज हॉस्पिटलला ६२,००० रु. दिले. महाराजांनी भारतातील विविध संस्था आणि व्यक्तींच्या स्त्रीविषयक कार्याला केलेली ढोबळ मदत ३ लाख ३१ हजार ५०० रु. इतकी होती. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम सुमारे ८१ कोटी ३२ लाख रु. हून अधिक भरते.

 महाराजांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केले त्या त्या क्षेत्रात 'पथदर्शक' आदर्श निर्माण केले. आपण जेव्हा फुले समग्र वाङ्मय समोर ठेवून महाराजांच्या कामाचा विचार करतो तेव्हा फुलेंनी सुधारणांच्या ज्या दिशा सूचित केल्या होत्या त्या दिशेने जात असताना महाराजांनी फुले विचाराच्या पलीकडे जाऊन काम केले असल्याचे शेकडो पुरावे मिळतात. म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्राचा आरंभबिंदू मानल्या गेलेल्या फुलेंनीही

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / २५