पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
कृतिशील सत्यशोधक
" विद्येविना मति गेली, मतीविना नीति गेली,


नीतिविना गती गेली, गतीविना वित्त गेले,


वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. "


 महात्मा फुल्यांच्या या ओळी गेल्या ६० वर्षातील महाराष्ट्रातील पुरोगामी प्रबोधन परंपरेचा 'मूलमंत्र' म्हणून लाखो वेळा उच्चारल्या गेल्या असतील. परंतु आपल्या प्रबोधन परंपरेतील 'जयघोष' संस्कृतीत या ओळी सुभाषिताच्या दर्जापलीकडे गेल्या नाहीत. 'अज्ञान हेच गुलामीचे प्रमुख कारण आहे' याची उथळ चर्चा महाराष्ट्रात वारेमाप झाली. परंतु फुल्यांच्या या ओळींचा मथितार्थ सर्वार्थाने 'कृतिशील' करणारा एकमेव प्रशासक म्हणून सयाजीरावांचे असणारे योगदान मात्र आम्ही चर्चेच्या परिघाबाहेर ठेवले.

 'फुले असे म्हणाले' आणि 'फुले तसे म्हणाले' याचीच कीर्तने आम्ही करत राहिलो. फुल्यांचे अज्ञानाला भिडण्याचे

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / ६