पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजवाडेंनी ब्राह्मण जातीला अडचणीचे ठरणारे कागद खाऊन टाकण्याची 'किमया' केली होती. अशी किमया करणारे 'किमयागार' ब्राह्मणी परंपरेपेक्षा पुरोगामी परंपरेतच जास्त आहेत हे सयाजीरावांचा इतिहास जसजसा पुढे येईल तसतसे अधिक ठळकपणे स्पष्ट होत जाईल.
 कारण फुले-शाहू-आंबेडकरी संशोधनात महापुरुषांच्या मर्यादा झाकण्याचा आटापिटा करणारे संशोधक अधिक संख्येने सापडतात. आपल्या या पुरोगामी संशोधन परंपरेने बहुजनांचे जेवढे नुकसान केले तेवढे अडीच हजार वर्षांच्या ब्राह्मणी परंपरेनेही केले नाही. हा इतिहास कोणासाठी गौरवशाली आहे? या प्रश्नाचे उत्तर आता महाराष्ट्राला शोधावे लागेल. फुले जयंतीच्या निमित्ताने या चिंतनाचे 'खडतर व्रत स्वीकारण्याची प्रेरणा सयाजीरावांच्या निमित्ताने नव्या पिढीला मिळाली तर पुरोगामी महापुरुषांच्या 'स्वप्नपुर्ती'कडे टाकलेले ते एक 'क्रांतिकारक' पाऊल ठरेल.

●●●
महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / २५