पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि
व्यायामविषयक कार्य


 महाराजा सयाजीरावांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य आपल्याला चकित करून सोडणारे आहे. एक प्रशासक जनतेचा किती खोल आणि सूक्ष्म पातळीवर विचार करू शकतो याचा उत्तम नमुना सयाजीरावांच्या कार्यप्रणालीतून व्यक्त होतो. म्हणूनच समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रात अगदी मुळापर्यंत जाऊन मूलभूत काम करण्याचा सयाजीरावांचा दृष्टीकोन भारतात सोडा जगाच्या इतिहासात अपवादात्मक ठरेल असा आहे. ज्या-ज्या क्षेत्रात त्यांनी काम केले त्या-त्या क्षेत्रात एखादा कर्तव्यदक्ष कुटुंबप्रमुख ज्याप्रमाणे कुटुंबाच्या सर्व आघाड्यांवर ज्या तळमळीने लक्ष देतो तीच तळमळ सयाजीरावांच्या सर्व कामात दिसते. एखादा राजा आपल्या प्रजेप्रती किती कर्तव्यदक्ष असू शकतो याचा जणू आदर्शच सयाजीरावांनी घालून दिला होता. प्रत्येक क्षेत्रातील कामाप्रमाणे सयाजीरावांनी प्रजेच्या आरोग्य आणि व्यायामाच्या क्षेत्रातही पायाभूत काम केले.

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / ६