पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरोग्यासाठी उभारलेल्या 'काउंटेस ऑफ डफरीन फंडा'स १०,००० रु. दिले. १९१३ मध्ये दिल्लीच्या लेडी हार्डिंग्ज स्त्री वैद्य विद्यालयास १ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य केले. १९१६ ला दिल्लीतील लेडी हार्डिंग्ज हॉस्पिटलला स्त्रियांसाठी ६२ हजार रु. दिले. १९२४ मध्ये हिंदी पहेलवान युरोपात पाठविण्याच्या फंडा १,००० रु. दिले. या काही प्रमुख रकमांचा उल्लेख येथे केला आहे. सयाजीरावांनी आरोग्यासाठी खर्च केलेली सर्व रक्कम एकत्रितपणे अंदाजे २५ कोटी ३३ लाख रु. हून अधिक भरते. बलशाली भारत घडवण्याच्या स्वप्नाचा पाठलाग स्वातंत्र्यानंतर गेली ७० वर्षे आपण करत आहोत. परंतु स्वातंत्र्यापूर्वी ७० वर्षे महाराजांनी या क्षेत्रात करून ठेवलेले काम आजही अनुकरणीय आहे.

 आज जग कोरोनाच्या महामारीने चिंताक्रांत झाले असतानाच्या पार्श्वभूमीवर सयाजीराव महाराजांची आरोग्य संवर्धक दृष्टी जगातल्या सर्वच प्रशासकांनी मार्गदर्शक म्हणून स्वीकारावी अशी आहे. 'रोग झाल्यानंतर इलाज करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून उपाययोजना करणे हे आरोग्यसूत्र सयाजीरावांनी आपल्या प्रशासनाचे धोरण म्हणून स्वीकारले होते. स्वच्छता, शुद्ध पाणी, पौष्टिक आहार आणि व्यायाम या चतु:सूत्रीवर महाराजांनी मूलभूत काम करून ठेवले होते. साथीच्या रोगांवरील महाराजांनी केलेली उपाययोजना हीसुद्धा

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / ३०