पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



नेमली. यासंबंधीचे शास्त्रीय शिक्षण देण्याकरिता युरोपमधून या विषयातील तज्ञ आणण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. परंतु यादरम्यान युरोपात पहिल्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने असा तज्ञ बोलावणे शक्य झाले नाही.
आरोग्य अहवालाचा आग्रह
 सयाजीरावांची नात इंदुमतीदेवी आणि शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांच्या विवाहावेळी सयाजीरावांनी शाहू महाराजांकडे राजारामांच्या आरोग्य अहवालाची मागणी २४ मार्च १९११ रोजीच्या पत्राद्वारे केली होती. आजच्या विज्ञानवादी युगातही लोक विवाह जुळवताना वधू-वरांची जन्मपत्रिका आणि गुण जुळवण्याच्या पलीकडे आरोग्य अहवालाचा अट्टाहास धरताना दिसत नाहीत. परंतु ११० वर्षापूर्वीचा सयाजीरावांचा हा वैज्ञानिक दृष्टिकोन आजच्या आधुनिक युगातही प्रगतशील ठरतो.
महाराजांचा व्यायाम

 महाराज जनतेच्या आरोग्याबरोबर स्वतःच्या आरोग्याबाबतही अतिशय जागरूक होते. महाराजांच्या दिनक्रमामध्ये प्रशासकीय कामांबरोबर व्यायाम आणि विविध खेळांचा समावेश होता. महाराज पहाटे मल्लखांबाचा सराव करत तर कधी दंड बैठका करून ते घोडे सवारी करत असत. महाराज सर्व सवंगड्यांबरोबर विविध खेळदेखील खेळत. यात मुख्यतः आट्यापाट्या, खोखो,

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / १७