पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दशखंडी व्यायामकोश (५,००० पाने) आणि 'व्यायाम' या मराठी, गुजराथी, हिंदी, इंग्रजी अशा चार भाषेतून एकाच वेळी निघणाऱ्या मासिकाचे संपादक दत्तात्रय चिंतामण मुजुमदार यांना सयाजीरावांनी १९१३ मध्ये पाश्चात्य देशांतील लोकांचा व्यायाम व आरोग्य यांचा अभ्यास करण्यासाठी सहा महिने युरोपला पाठविले. तर १९९४-१५ ला सूक्ष्मजंतूशास्त्र व रोगनिदानशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. पी. एम. नानावटी यांना मोहवाला येथे पाठविले.
साथ रोग नियंत्रण
 १८८४ मध्ये बडोद्यात पटकीची साथी आली. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय योजना राबविण्यात आल्या, त्यामध्ये नवसारी प्रांतात फिरता दवाखाना सुरू केला, तर बडोदा शहरात ८ वैद्यकीय केंद्रे उघडली. एप्रिल मध्ये १९०० दुष्काळी छावणीत पटकीची साथ आली आणि राज्याच्या संपूर्ण भागात पसरली या पटकीग्रस्तांची संख्या १९,८७७ झाली. यावर उपाय म्हणून दररोज पोटॅशियम परमँगनेटने पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण केले जाऊ लागले. त्याचबरोबर कारागृहातील कैदी व गरीब लोकांना दररोज रोगप्रतिबंधात्मक गोळ्या मोफत दिल्या जाऊ लागल्या.

 बडोदा संस्थानात १८९६-९७ ला प्लेगची साथ आली होती. प्लेगचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संस्थानात अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. याचवर्षी यात्रेकरूंसाठी आणि प्लेग

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / १२