पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जोहेन्स बेल्ट्झ यांनी बाबासाहेबांच्या ज्या धर्म सुधारणेच्या कार्यक्रमाचे हे मूल्यमापन केले आहे त्या कार्यक्रमातील मूलभूत गाभ्याची कलमे ही बडोद्याच्या हिंदू पुरोहित कायद्यातील असल्यामुळे हे मूल्यमापन बडोद्याच्या हिंदू पुरोहित कायद्याचेच मूल्यमापन आहे. या मुल्यमापनातून पुरोहित कायदा हा किती क्रांतिकारक होता याची प्रचीती येते. भारतीय प्रबोधन परंपरेने वेळीच सयाजीरावांच्या या कामाशी जोडून घेतले असते तर क्रांतिकारक समाजपरिवर्तनाचे सर्वच प्रबोधनपुरुषांनी पाहिलेले स्वप्न बऱ्याच अंशी पूर्ण झाले असते.
 परांजपे नावाच्या ब्राह्मण मित्राच्या वरातीतून हाकलल्यानंतर वयाच्या विशीनंतर फुलेंमधील क्रांतिकारक घडला. वेदोक्ताने श्रद्धाळू राजर्षी शाहूंमधील क्रांतिकारक वयाच्या २६ व्या वर्षी जन्माला घातला. तर अस्पृश्यतेचे चटके सोसलेल्या आंबेडकरांमधील समतावादी नेता वयाच्या पंचविशीत अमेरिकेतील शिक्षणाद्वारे सयाजीरावांनी घडवला. या तुलनेत धार्मिक हक्क आणि जातिभेद यांचा कोणताही नकारात्मक अनुभव न घेताही १८७७ ला वयाच्या १४ व्या वर्षी अस्पृश्यांबरोबर सहभोजन करणारे सयाजीराव भारतातील सर्वात मोठे समाजक्रांतिकारक ठरतात. सयाजीरावांनी पुरोहित कायद्याअगोदर वैयक्तिक जीवनापासून केलेल्या धर्मसुधारणा

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / २८