पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



(३) सनद नसलेल्या पुरोहिताने केलेला कोणताही समारंभ विधिसंमत मानण्यात येऊ नये, तसेच सनद नसताना पौरोहित्य करणे शिक्षापात्र गुन्हा ठरविण्यात यावा. "
 या निबंधातच पुढे धर्मसुधारणेसाठीचा कार्यक्रम देताना त्यासाठी कायदा करण्याची गरज व्यक्त करताना बाबासाहेब म्हणतात, “मी वर सांगितल्याप्रमाणे पुरोहितवर्गाला अशा कुठल्यातरी कायद्याच्या नियंत्रणाखाली आणलेच पाहिजे. त्यामुळे यांना उपद्रव करण्यास तसेच लोकांची दिशाभूल करण्यास प्रतिबंध होईल. तो पेशा सगळ्यासाठी खुला केल्यामुळे त्याचे लोकशाहीकरण होईल. ब्राह्मणशाही तसेच ब्राह्मणशाहीचा मूर्तीमंत अवतार असलेली जात संपविण्यासाठी त्याची खात्रीने मदत होईल. ब्राह्मणशाही हे विष असून त्याने हिंदूंचे वाटोळे केले आहे. तुम्ही ब्राह्मणशाही संपविली तर हिंदूत्व वाचविण्यात तुम्हाला यश येईल.”
 बाबासाहेबांनी सुचवलेल्या धर्म सुधारणेच्या पाच कलमी कार्यक्रमातील गाभ्याचा भाग म्हणजे दोन आणि तीन क्रमांकाची कलमे आहेत. ती दोन कलमे म्हणजे सयाजीरावांनी केलेल्या पुरोहित कायद्यातील सर्व कलमांचे एकत्रीकरण आहे. हे पुरोहित कायद्यातील कलमे आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या कलमातील दोन आणि तीन क्रमांकाच्या कलमांची समोरासमोर तुलना केल्यानंतर स्पष्ट होते. यातील उरलेली तीन कलमे अत्यंत जुजबी आहेत. विशेष बाब म्हणजे बाबासाहेबांनी हा निबंध लिहिण्याआधी २१ वर्षे बडोद्यात पुरोहित कायदा लागू झाला

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / २६