पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंदू पुरोहित कायदा : आंबेडकरांकडून 'जसेच्या तसे'
अनुकरण
 जगभर धर्म आणि पुरोहित वर्गाचे वर्चस्व असताना पुरोहितांकडून होणाऱ्या शोषणातून लोकांची मुक्तता करणारा पुरोहित कायदा हा जगातील अशा प्रकारचा एकमेव कायदा होता जो आजच्या क्रांतिकारक बदलाच्या कालखंडातही भारताला करणे सहज साध्य नाही. सयाजीरावांनी बडोद्यात लागू केलेला पुरोहित कायदा ही २००० वर्षांच्या हिंदू धर्म-संस्कृतीच्या इतिहासातील एक मोठी क्रांती होती. परंतु हिंदू धर्म अभ्यासाच्या इतिहासात या कायद्यावर एक शब्दही लिहिला गेला नाही.
 या कायद्याचा बौद्धिक चर्चाविश्वात उपयोग करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव आहेत. १९३६ मध्ये लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या न झालेल्या वार्षिक परिषदेसाठी बाबासाहेबांनी तयार केलेले अध्यक्षीय भाषण त्याच वर्षी 'Annihilation Of Caste' या नावाने ग्रंथ रूपात प्रकाशित झाले. या ग्रंथाच्या २४ व्या भागात अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने धार्मिक सुधारणांसाठीचे मुद्दे बाबासाहेबांनी सुचवले आहेत.
 या निबंधात बाबासाहेब म्हणतात, “जेव्हा मी नियमाच्या धर्माचा निषेध करतो तेव्हा धर्माची गरज नाही असे माझे मत असल्याचा समज होता कामा नये. या उलट बर्कच्या पुढील विधानाशी मी सहमत आहे, "खरा धर्म हा समाजाचा पाया असतो

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / २४