पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्यात आली होती. धर्म विधी करणाऱ्या पुरोहितांना कायद्याच्या कक्षेत आणून त्यांना कर्तव्यातील हलगर्जीबाबत शिक्षा करणारा पुरोहित कायदा हा जगातील अशा प्रकारचा पहिला कायदा ठरतो. तर कायद्याच्या माध्यमातून पुरोहित वर्गाला धार्मिक शिस्त लावणारे सयाजीराव जगातील पहिले प्रशासक ठरतात.

 १९९५ च्या या पुरोहित कायद्यानुसार सर्व जातीतील पुरोहितांना धार्मिक विधी करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला असला तरी ब्राह्मणेतर जातीतील व्यक्तींना पारंपरिक समाजव्यवस्थेत संस्कृत शिक्षण उपलब्ध नसल्यामुळे पुरोहित कायद्यातील तरतुदींचा लाभ घेणे शक्य नव्हते. पुरोहित कायदा लागू करत असतानाच समाजातील ब्राह्मणेतर जातींना विशेषत: अस्पृश्य जातींना संस्कृत शिक्षण देण्याची आवश्यकता होती. म्हणूनच कायदा लागू करण्यापूर्वी २ वर्षे १९१३ मध्ये अस्पृश्य पुजाऱ्यांना संस्कृत शिक्षण देण्याच्या उद्देशाने पुरोहित प्रशिक्षण शाळा सुरू केल्या. पहिल्याच वर्षी या शाळेत २५ अस्पृश्य विद्यार्थी संस्कृत शिक्षण घेत होते. या शाळेतील अस्पृश्य विद्यार्थ्यांना महाराजांनी ५ रु. च्या १० शिष्यवृत्तीही सुरू केल्या. सयाजीरावांची ही पूर्वतयारी त्यांची मूलगामी समाजसुधारणेची धडपड स्पष्ट करते.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / २१