पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या भाषणात सयाजीराव म्हणतात, “ब्राम्हण विद्वान आहेत; पण देशाची सुधारणा होणे असेल तर ब्राह्मणांच्या विद्वत्तेबरोबर त्यांचे विचारही सुधारले पाहिजेत. ब्राम्हण भिक्षुकवर्ग यांचे कर्तव्य किती महत्त्वाचे आहे याचा विचार करा. परंतु आपल्यावरील जबाबदारी ओळखीत नाहीत, ही गोष्ट फार वाईट आहे. मी खरे आहे ते बोलतो याचा कोणी राग मानू नये. बैलावर साखरेची अगर मातीची गोणी घातली तरी त्याला सारखीच, त्याप्रमाणे भिक्षुकवर्गाची स्थिती झाली आहे. भिक्षुकांचे नुसते पोपटपंचीचे ज्ञान बिलकूल उपयोगाचे नाही असा श्रेष्ठ वर्ग जर अडाणी राहिला तर देशाचे कोणत्याही प्रकारे कल्याण होणार नाही. सुशिक्षित शास्त्री संस्कृत पाठ म्हणू शकतात; परंतु मातृभाषेत आपले विचार त्यास सांगता येत नाहीत. धर्माचा उपदेश देणारे लोक चांगले समजदार असले पाहिजेत. जुने रिवाज मोडणे शक्य व कायदेशीर असेल तर राजाने धैर्याने त्यात फेरफार केला पाहिजे.” या पार्श्वभूमीवर आपल्याला १९१५ चा हिंदू पुरोहित कायदा समजून घ्यावा लागेल.

 पुरोहित कायदा १९९५ मध्ये लागू केला असला तरी १९११ पासून सयाजीरावांनी त्याची पार्श्वभूमी तयार करण्यास सुरुवात केली होती. १९९१ मध्ये पुरोहित व पुराणिक यांचे धार्मिक ज्ञान तपासण्यासाठी परीक्षा घेण्याचा आदेश सयाजीरावांनी दिला. या आदेशानुसार नोव्हेंबर १९१२ मध्ये बडोद्यात पुरोहित व

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / १५