पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५) विशिष्ट परिस्थितीत विवाहित व विधवा स्त्रीला तिच्या उपजीविके साठी वडिलांच्या सपं त्तीवर दावा सांगता येईल.
६) विधवा सनु ेला वारसाच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे.
 ७) मृत मुलीच्या मुलांना जिवंत मुलींबरोबर सपं त्तीत वाटा देण्यात यावा.
 मृत मुलींच्या मुलांना जिवंत मुलींबरोबर सपं त्तीत वाटा देण्याची सयाजीरावांनी के लेली तरतूद स्वतंत्र भारतात ७० वर्षांनंतरदेखील लागू होऊ शकली नाही यातच सयाजीरावांच्या या कायद्याचे क्रांतिकारकत्व लपले आहे. १९३३ च्या कायद्यामुळे स्त्रियांचा हिंदू कुटुंबातील दर्जा व वैवाहिक स्थान उंचावले. महिला सबलीकरणाचे भारतातील स्वातंत्र्योत्तर काम पाहता आजही भारतातील महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलने, कोर्ट-कचेऱ्या कराव्या लागतात. कायदे झाले तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. राज्यघटना लागू के ल्यानंतर ७० वर्षांनी लोकशाहीची मूल्ये रुजवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. या पार्श्वभूमीवर या कायद्याद्वारे राबवलेल्या योजना आजही मार्गदर्शक आहेत.
 २९ जानेवारी १९२७ रोजी बडोदा येथे के लेल्या भाषणात हिंदू स्त्रियांच्या उन्नतीबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना

महाराजांनी व्यक्त के लेले चिंतन मौलिक आहे. बडोद्याच्या हिंदू

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल /२३