पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काणेंनी जे मुद्दे अग्रक्रमाने मांडले आहेत,त्या मुद्द्यांसदं र्भातील धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा कार्यक्रम, काणेंनी हिंदू धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्याअगोदर सयाजीरावांनी बडोद्यात यशस्वी के ला होता.
 स्वतंत्र भारतात १९५५ मध्ये Hindu Marriage Act समंत करण्यात आला. या कायद्यात विवाहासाठीचे विधी आणि पद्धती निश्चित करण्यात आल्या. त्याआधी ५० वर्षे १९०५ च्या हिंदू विवाह कायद्यात सयाजीरावांनी हिंदू लग्नाच्या मूलतत्त्वांची व्याख्या करतानाच लग्न करणाऱ्या स्त्री-पुरुषांचे परस्परसबंधातील हक्कदेखील निश्चित के ले होते.

हिंदू दत्तक नोंदणी कायदा - १९१०
 हिंदू कोड बिलासदं र्भातील दुसरा महत्वाचा ‘हिंदू दत्तक नोंदणी कायदा’ सयाजीरावांनी १९१० मध्ये बडोद्यात लागू के ला. हिंदू धर्म परंपरेनुसार कोणत्याही व्यक्तीला के वळ त्याच्या रक्तसबं ंधातील व्यक्तीलाच दत्तक घेता येत होते. तसेच प्रत्येक व्यक्तीला दत्तकप्रसगं ी दत्तक होम विधी करणे बंधनकारक होते. १९१० च्या या कायद्यानुसार दत्तक होम विधीची प्रथा सपं ुष्टात आणताना ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या सर्वांसाठी दत्तक होम विधी अनावश्यक ठरवण्यात आला. महाराजांचे हे सर्व प्रयत्न म्हणजे हिंदू धर्माभोवती शेकडो वर्षे कर्मकांडाची जी भली मोठी वारुळे

वाढली होती ती काढण्याचाच प्रयत्न होता.<

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल /१९