पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकशाही भारताला पथदर्शक ठरेल असे हिंदू कोड बिलाचे काम स्वातंत्र्यपूर्व काळातच महाराजांनी करून ठे वले होते. हे कायदे करण्यासाठी हिंदू धर्मशास्त्राचा व्यासगं आवश्यक होता. सयाजीरावांनी राज्याधिकार मिळाल्यापासनू च हिंदू धर्मशास्त्राचा आपला व्यासगं जगातील प्रमुख धर्मशास्त्रांच्या तुलनात्मक अभ्यासातून किती परिपूर्ण के ला होता आणि दुसऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेचे अध्यक्षपद त्यांना वारंवार विनंती पत्रे पाठवून सन्मानाने का दिले गेले होते याचा उलगडा महाराजांच्या धर्मविषयक भाषणातून होतो.

हिंदू विवाह कायदा - १९०५

 बडोद्याच्या हिंदू कोड बिलातील पहिला हिंदू विवाह कायदा सयाजीरावांनी १९०५ मध्ये लागू के ला. हिंदू विवाह कायदा करणारे बडोदा हे ब्रिटिश भारत आणि तत्कालीन ५६५ ससं ्थानातील पहिले ससं ्थान आहे. हा कायदा करून सयाजीरावांनी भारतातील हिंदू कोड बिलाची पायाभरणी के ली. या कायद्यात हिंदू लग्नाच्या मूलतत्वांची व्याख्या करून, कायदेशीर लग्नाच्या अवश्य गोष्टी, स्त्री-पुरुषांचे परस्पर हक्क, त्यांचे मिळकतीवरील अधिकार, एकमेकांबद्दलची जबाबदारी व लग्न सबं ंधाची अविछीन्नता या सर्व गोष्टी निश्चित करण्यात

आल्या. यापूर्वी हिंदुतं ील कित्येक हलक्या जातींत लग्नाचे

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल / १६