पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बडोद्याच्या या हिंदू कोड बिलाचे एकूण ६ घटक होते. १) विवाह २) दत्तक ३) पालक आणि मुले ४) वारसा हक्क ५) कौटुंबिक सबं ंध ६) कौटुंबिक सपं त्ती. बडोद्याच्या हिंदू कोड बिलातील पहिला कायदा हिंदू विवाह कायद्याच्या रूपाने १९०५ मध्ये लागू झाला. हिंदू सयं ुक्त कुटुंब कायदा हा यातील दुसरा कायदा होता. या कायद्यात हिंदू कुटुंब रचना आणि सपं त्तीच्या सहमालकीची वैशिष्ट्ये आणि घटनांचे विश्ले षण केले होते. सपं त्तीच्या वाटणीचे परिणाम आणि कुटुंबाची पुन्हा एकत्र येण्याची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये यात सांगितली होती.
 तिसऱ्या कायद्यात हिंदू कुटुंबाचे सर्वात महत्त्वाचे सदस्य असलेल्या पालक आणि मुले यांच्यातील सबं ंधांची चर्चा करण्यात आली. यामध्ये आई-वडिलांचा त्यांच्या मुलांवरील पालक म्हणून असणारा सर्वोच्च अधिकार मान्य करण्यात आला. त्याचवेळी मुलांच्या पालन-पोषणाची आणि शिक्षणाची जबाबदारी पालकांवर टाकण्यात आली. तसेच वडिलोपार्जित सपं त्तीवरील वडील आणि मुलाच्या अधिकाराबाबतचे नियम देखील विशद के ले गेले. वडिलांनी काढलेल्या कर्जाबाबतच्या मुलाच्या जबाबदारीचे स्वरूप आणि व्याप्ती या कायद्यात निश्चित करण्यात आली. शेवटच्या हिंदू मालमत्ताविषयक कायद्यात हिंदू

व्यक्तीच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनाच्या अधिकाराची चर्चा

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल /१४