पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



महाराजा सयाजीराव
आणि
स्वतंत्र धर्म खाते

 महाराजा सयाजीराव गायकवाड हे आधुनिक भारतातील आज अखेरचे सर्वांत पुरोगामी राज्यकर्ते आहेत. इतकेच काय भारतीय धर्मसुधारणेच्या इतिहासात अगदी राजाराम मोहन रॉय यांच्यापासून ते नरेंद्र दाभोळकरांपर्यंतचे सगळे प्रयत्न सयाजीरावांच्या धर्मसुधारणेशी जोडून विचारात घेतले तर वरील विधानाची प्रचीती येईल. कारण ब्रिटिश आगमनानंतर मुख्यतः अमेरिकन आणि ब्रिटिश ख्रिश्चन धर्म प्रसारकांच्या धर्म प्रसार चळवळीतून हिंदू धर्म चिकित्सेला सुरुवात झाली. हिंदू धर्माचे सर्वांत मोठे चिकित्सक महात्मा फुले यांची हिंदू धर्म चिकित्सा हीसुद्धा अमेरिकन आणि स्कॉटिश यांच्या प्रेरणेने सुरू झाली होती. फुलेंच्या समोर यासंदर्भातील आदर्श मुख्यत: अमेरिकन आणि काही अंशी फ्रेंच मिशनरी होते, महत्त्वाचे म्हणजे ब्रिटिश नव्हते; परंतु भारतातील धर्म सुधारणेचा इतिहास विचारात घेता सुनियोजित पद्धतीने आणि दीर्घकालीन धोरण म्हणून धर्मसुधारणेचा कार्यक्रम आखणारे ब्रिटिश आगमनापासून आज

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ६