पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हता त्या सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ रु.च्या दहा शिष्यवृत्त्या दिल्या जात होत्या. सामाजिक बदलास आवश्यक 'पूर्वतयारी' करण्याबाबतची सयाजीरावांची तत्परता यातून अधोरेखित होते.

इंदिराराजेंचा आंतरजमातीय विवाह

 महाराष्ट्राला शाहू महाराजांच्या प्रेरणेने शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील चुलतबहिणीचा इंदूरच्या होळकरांबरोबर १९२४ मध्ये झालेला मराठा-धनगर हा आंतरजातीय विवाह माहीत आहे; परंतु शाहू महाराजांना या आंतरजातीय विवाहाची प्रेरणा देणारा त्याअगोदर ११ वर्षे १९९३ ला झालेला राजघराण्यातील पहिला मराठा-आदिवासी आंतरजमातीय विवाह महाराष्ट्राला माहीत नाही. असा विवाह सयाजीराव महाराजांची कन्या इंदिराराजे यांनी कूचबिहार या आदिवासी संस्थानातील राजकुमार जितेंद्र नारायण यांच्याशी स्वतःच ठरवून केला होता. विशेष म्हणजे सयाजीरावांनी ग्वाल्हेरच्या माधवराव शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह ठरवला होता. असे असतानाही सयाजीराव या विवाहात स्वतःची प्रतिष्ठा आडवी न येऊ देता खंबीरपणे मुलीच्या पाठीशी उभे राहिले.

 सयाजीरावांच्या मुलीने केलेला हा विवाहसुद्धा सयाजीरावांनी आपल्या राज्यात केलेल्या धर्मसुधारणा उपक्रमाशी जोडून विचारात घ्यावा लागतो. कारण इंदिराराजेंचे हे बंड फक्त सयाजीरावांच्या निर्णयाविरुद्धचे बंड एवढ्या वैयक्तिक

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / २८