पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 लक्ष्मण कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'अन्योन्य सहकारी मंडळी' या सहकारी तत्त्वावरील बँकेची स्थापना करण्यात आली. ही भारतातील दुसरी सहकारी बँक होती. यापूर्वी गोविंद बाबाजी यांच्या वसई असोसिएशनने १८६२ मध्ये सहकारी पतपेढीचा प्रयोग केला होता.

 अरुण जोशींच्या मते, ही महाराष्ट्रातील किंबहुना हिंदुस्थानातील पहिली सहकारी पेढी असावी. १९०५ मध्ये संमत करण्यात आलेल्या सहकार कायद्याने बडोद्यामध्ये सहकाराच्या नव्या नांदीला सुरुवात झाली. याचे उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रगत कोल्हापूर संस्थांनाशी बडोद्याची तुलना केली तर या नांदीची व्याप्ती आपल्या लक्षात येईल. १९२०-२१ मध्ये कोल्हापूर संस्थानात ३७ सहकारी संस्था होत्या तर त्याचवर्षी बडोद्यातील सहकारी संस्थांची संख्या ५०९ इतकी होती. म्हणजेच कोल्हापूर संस्थानच्या १४ पट सहकारी संस्था बडोद्यात होत्या.

बँक ऑफ बडोदा आणि बडोद्यातील सहकार चळवळ

 बडोद्यातील सहकार चळवळीच्या विकासासाठी संस्थानातील विविध उद्योग व सहकारी संस्थांना आर्थिक पाठबळ पुरवणे अत्यावश्यक होते. सयाजीरावांनी १९०६ मध्ये अमेरिकन अर्थतज्ज्ञ व्हाईटनॅक यांची राज्याच्या औद्योगिक प्रगतीसंदर्भातील विषयांसाठीचे तज्ज्ञ सल्लागार म्हणून नेमणूक केली. भारतात आर्थिक सल्लागारपदी नियुक्त झालेले

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ७