पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सहकारचा असा व्यापक विकास त्या काळात ब्रिटिश प्रांत, संस्थानेच काय तर स्वातंत्र्यानंतरच्या भारतात आजही झाल्याचे आढळत नाही. सयाजीरावांचे सहकार धोरण जर देशातील आजच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारले तर समाजातील आर्थिक विषमता मिटविण्यात फार मदत होईल. त्यांचे सहकार धोरण मूलत: समाजातील शेवटच्या घटकाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीचे होते. पर्यायाने संपूर्ण समाजाच्या समतोल विकासाचे सुद्धा होते.


●●●
महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ५०