पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
संस्कृत भाषा संवर्धन

 महाराजा सयाजीराव हे मानवी संस्कृतीचा परिपूर्ण आणि ज्ञानमार्गी विचार करणारे राज्यकर्ते होते. धर्म, भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा कोणत्याही भेदभाव आणि दुराग्रहाशिवाय विचार करणारे खरे प्रज्ञावंत होते. जगातील सर्व संस्कृती मानवजातीसाठी ज्ञानाचा झरा आहे ही डोळस श्रद्धा ते जगत आले. त्यामुळे भारतीय असूनही धर्म आणि जातमुक्त निखळ मानवतावादी युगपुरुष म्हणून त्यांचा विचार करावा लागेल. धर्म आणि जात यांच्या जोरखंडातून मुक्त करताना त्यांना स्वतः तुलनात्मक विचारशक्तीचे पाईक बनविले. परिणामी संस्कृती धर्म, जात यांच्या पोकळ अभिमानावर ते मात करू शकले. भारतीय समाज आणि संस्कृतीचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर संस्कृत भाषा आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणले. त्यामुळेच राज्यकारभार हाती आल्यापासूनच संस्कृत ग्रंथांचे मराठी, गुजराती भाषंतर, हिंदू धर्मातील सर्व जातींना मोफत संस्कृत शिक्षण देणे, प्राच्यविद्या संस्थेच्या

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / ६