पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सुद्धा मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या संवर्धनात बडोद्याचे किंवा महाराजांचे काय योगदान आहे याबद्दल एक शब्दही केतकर बोलले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे १८८५ पासून ४८ वर्षे मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाचे महाराष्ट्रात झाले नाही एवढे काम महाराजांनी बडोद्यात केले होते. हे सर्व विचारात घेता केतकरांना महाराजांकडून झालेली मदत आणि मिळालेला सन्मान हे महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. येथे एक बाब नमूद करावी लागेल ती अशी की फेब्रुवारी १९३२ च्या नोटीस प्रकरणानंतर महाराजांनी कोणतीही कटुता मनात न ठेवता या घटनेनंतर १० महिन्यांतच प्राच्यविद्या परिषदेत डिसेंबर १९३३ मध्ये मराठी भाषा सत्राचे अध्यक्षपद सन्मानाने दिले. यातून महाराजांचा सुसंस्कृतपणा, क्षमाशील वृत्ती आणि विशाल दृष्टीची प्रचिती येते.
केतकरांचा जातीभिमान

 केतकरांना कोकणस्थपणाचा आणि ब्राम्हणपणाचा खूपच अभिमान होता त्यामुळे ते म्हणत की, 'ज्या जातीला हिंदुस्थानवर सत्ता गाजविण्याचे अधिकार अठराव्या शतकात मिळाले होते व ज्या जातीने हिंदुस्थानच्या एकीकरणाचे धडे प्रथम घालून दिले त्या महाराष्ट्रीय ब्राम्हण जातीत माझा जन्म झाला आहे !' १९३० च्या दशकात तर ते स्वतःला केवळ थोर नाही तर 'थोर ब्राम्हण' समजत असत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सयाजीराव महाराज गायकवाडांच्या हीरकमहोत्सवाचे

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / १९