पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्याला खंबीर मदतीचा हात देणाऱ्या सयाजीरावांनी सहकार चळवळीचे 'मर्म' अचूक जाणले होते. या सहकार चळवळीची उद्योगाशी 'योग्य' सांगड घालत सयाजीरावांनी आपल्या संस्थानातील शेतकऱ्यांचा उत्कर्ष साधला. औद्योगिक 'आत्मनिर्भरते' चे अनावश्यक स्तोम न माजवता शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्यासाठीची सयाजीरावांची ‘तळमळ' आपण समजून घेतली तरच शेतकरी खऱ्या अर्थाने 'बळीराजा' म्हणून आयुष्य जगू शकेल.

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ४१