पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे

 महाराजा सयाजीराव यांनी भारताच्या सर्वांगीण आधुनिकीकरणाचा पाया घातला. कारण त्यांनी एका विशिष्ट क्षेत्रातच काम केले असे नाही. त्याचप्रमाणे फक्त आपले बडोदा संस्थान डोळ्यासमोर ठेवूनही काम केले नाही. ते जरी संस्थानचे राजे असले तरी जगातील प्रमुख आणि प्रगत राष्ट्रांशी फक्त आपल्या संस्थानाचे नाही तर देशाची तुलना करत जगातल्या प्रतिष्ठित राष्ट्रांमध्ये आपल्या राष्ट्राचा समावेश होण्यासाठी जे करायला हवे ते सर्व करण्याकडे त्यांचा कल होता. धर्म आणि जात याबाबी आपल्या राष्ट्राच्या प्रगतीतील सर्वांत मोठे आव्हान आहे हे ओळखणारे ते पहिले भारतीय प्रशासक आहेत. कारण १८८१ ला राज्यकारभार हाती घेतल्यानंतर आणि प्रामुख्याने १८८७ च्या पहिल्या परदेश प्रवासानंतर त्यांचे तुलनात्मक चिंतन या दिशेने विकसित होत गेले. १९०९ मध्ये महाराजांनी लिहिलेल्या 'The Depressed Classes' या निबंधात त्यांनी 'अस्पृश्यतायुक्त भारत

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / ६