Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्मांवर दाखविलेला विश्वास हे राजा रवी वर्मांच्या चित्रकलेच्या यशस्वी कार्यकीर्दीतला सुवर्णकाळ मानला पाहिजे.
कलासक्त महाराजा सयाजीराव गायकवाड
 यानंतर १८९० मध्ये महाराजांनी बडोद्यात कलाभवन स्थापन केल्यानंतर त्यात चित्रकलेचा एक वर्ग उघडला. त्यासाठी बुधवारकरांना चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी मुद्दाम युरोपला पाठवून परत आल्यावर याच शाखेचे मुख्याध्यापक म्हणून नेमण्यात आले. बुधवारकरांनी काढलेल्या उत्तम चित्रांचा संग्रह बडोद्यात पाहायला मिळतो.
 अशाप्रकारे ललितकलेत चित्रकलेला प्राधान्य देऊन आपल्या राज्यात उन्नती घडवून आणण्याचे प्रयत्न महाराजांनी तन-मन-धन ओतून केले, त्यांना वरील विषयाबद्दलची अभिरुची हेच कारणीभूत झाले. केवळ उपयुक्ततेच्या दृष्टीने अशा कलांना उत्तेजन देणे व स्वत:च्या अंत:प्रेरणेने त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे या दोन गोष्टी स्वभावतः भिन्न आहेत. म्हणून या दोन प्रकारांपैकी बेनिन जॉन्सन ( Ben Johnson ) या कवीने म्हटल्याप्रमाणे-
 “The thirst that from soul doth rise,
Doth ask a drink divine.'
 “ अंत:करणाची तृषा शांत करण्यास उपयोगी पडणाऱ्या साहित्यसंगीतादी कला' यांची अभिरुची महाराजांना जात्याच होती, असे दिसून येते.